पाकिस्तानी जहाजामुळे जिहादचा धोका?

पाकिस्तानच्या जहाजामुळे खोल समुद्रात जिहादचा धोका उद्भवू शकतो, असे मत नौदलप्रमुख आर. के. धोवन यांनी व्यक्त केले आहे

पाकिस्तानच्या जहाजामुळे खोल समुद्रात जिहादचा धोका उद्भवू शकतो, असे मत नौदलप्रमुख आर. के. धोवन यांनी व्यक्त केले आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता याकडे धोवन यांनी अंगुलीनिर्देश केला आहे.
सागरी दहशतवादाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून त्याचा मुकाबला करण्यास नौदल सिद्ध आहे. पाकिस्तानच्या जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला, त्याची भारताने गंभीर दखल घेतली आहे, असेही धोवन म्हणाले.
पाकिस्तानच्या जहाजाचे अपहरण करून त्याद्वारे अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करण्याची योजना होती, असे एका अहवालात म्हटले आहे, तर दुसऱ्या अहवालानुसार भारतीय जहाजावर हल्ला करण्याची योजना असल्याचे म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pakistani ship in high seas can pose jihadi threat navy chief admiral r k dhowan

ताज्या बातम्या