माजी अध्यक्ष मोर्सी यांना पदच्युत करून लष्कराच्या साहाय्याने सत्तेवर आलेले आणि सध्या अनेक अडचणींना सामोरे जात असलेले सीरियाचे अध्यक्ष बशर-अल्-असाद यांच्या सैन्याविरुद्ध लढणाऱ्यांना आता पाकिस्तानी तालिबानींनी साहाय्य करायचे ठरविले आह़े  त्यासाठी अरब आणि उझबेकी हल्लेखोरांना सीरियात पाठविण्यास पाकिस्तानी तालिबानींनी सुरुवात केल्याचे तालिबानी सूत्रांनी शनिवारी सांगितल़े.
या कारवाईसाठी सीरियामध्ये औपचारिकरीत्या तळ स्थापन करण्याची कोणतीही योजना नाही; परंतु आमची माणसे बशर यांच्या सैन्याशी लढतील, असेही या सूत्राने सांगितल़े  पहिल्या टप्प्यात गनिमी काव्यात पारंगत असलेले प्रशिक्षक तेथे पाठविण्यात येत आहेत़  हे हल्लोखोर प्रामुख्याने अरब, उझबेक आणि चेचेन या पर्वतीय भागांतील आहेत़  २००१ साली अफगाणिस्तानवर आक्रमण झाल्यापासून हे अतिरेकी या भागांतील टोळीवाल्यांच्या प्रदेशात राहत आहेत़  सुन्नी पंथियांबद्दल तालिबान्यांना मुळातच जिव्हाळा आह़े  त्यामुळे त्यांना सिरियातील आयते कोलीत मिळाले आह़े