जम्मू-काश्मीरमधील पूंछ भागात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार करून भारतीय लष्करातील एका अधिकाऱयाची हत्या केली. नियंत्रण रेषेजवळ दोन भारतीय जवानांची हत्या करून त्यापैकी एकाचे शिर कापून नेण्याची घटना ताजी असतानाच पाकिस्तानी सैन्याच्या या नव्या कृत्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
हत्या करण्यात आलेल्या लष्करी अधिकाऱयाने नाव अद्याप समजलेले नाही. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी नवाझ शरीफ आरुढ झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. मात्र, नियंत्रण रेषेजवळील या कृत्यामुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jun 2013 रोजी प्रकाशित
पूंछमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी गोळीबारात लष्करी अधिकाऱयाची हत्या
जम्मू-काश्मीरमधील पूंछ भागात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार करून भारतीय लष्करातील एका अधिकाऱयाची हत्या केली.
First published on: 07-06-2013 at 05:42 IST
TOPICSपुंछ
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani troops violate ceasefire kills army officer in poonch sector