पाकिस्तानातील महागाईचा वणवा अद्यापही शांत झालेला नसून चार महिन्यांनंतर पुन्हा एकदा महागाई वाढली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने बेलाआऊट योजनेअंतर्गत पाकिस्तानला ३ डॉलर अब्जची मदत केल्यानंतर काही अटी घातल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानात पुन्हा एकदा महागाई वाढली आहे.

पाकिस्तानातील परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता तेव्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ३ अब्ज डॉलरची मदत करून देशाला दिवाळखोरीतून बाहेर काढलं. परंतु, त्यावेळी आयएमएफने पाकिस्तानला काही अटी शर्थीही लावल्या. त्यानुसार, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवण्याचीही अट होती. त्यामुळे सरकारने सातत्याने इंधन दरांत वाढ केली. यामुळे महागाईच्या दरांतही वाढ झाली. मे महिन्यात पाकिस्तानचा महागाई दर ३८ टक्के होता. मे महिन्यांनंतर चार महिन्यांनी सप्टेंबरचा महागाई दर ३१.४ झाला आहे. ऑगस्टमध्ये हाच दर २७.४ टक्के होता. पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने ही माहिती जाहीर केली आहे.

loksatta analysis heavy obligations reason behind elon musk delaying tesla in india
विश्लेषण : टेस्लाच्या वाटचालीत स्पीडब्रेकर? जगभर मागणीत घट का? भारतात आगमन लांबणीवर?
indian air force
युद्ध, मदत व बचावकार्य या आघाड्यांवर भारतीय हवाई दल किती कार्यक्षम? ’गगन शक्ती २०२४‘ कवायतीने दिले उत्तर!
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारने इंधनाच्या किमती वाढवल्या आहेत. तसंच, जुलैमध्ये सुरू झालेला बेलआउट कार्यक्रम सुरू ठेवण्यासाठी आयएमएफच्या अटींचा भाग म्हणून गॅसच्या किमती वाढवल्या आहेत. यामुळे पाकिस्तानात उदरनिर्वाहाचा खर्च वाढला आहे. इंधन दरांत ३१.२६ टक्क्यांनी, तर, खाद्यपदार्थांच्या किमतीत ३३.११ टक्क्यांनी वर्षभरात वाढ झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. तसंच, घर, पाणी आणि विजेच्या किमतीत २९.७० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पेट्रोल-डिझेल-सिलिंडरच्या किमती गगनाला

देशाच्या तेल आणि वायू नियामक प्राधिकरणाने (OGRA) एलपीजीची किंमत २०.८६ प्रतिकिलोने वाढवली. त्यामुळे २६०.९८ प्रति किलो एलपीजीची किंमत झाली आहे. या व्यतिरिक्त, घरगुती सिलिंडरची किंमत देखील २४६.१६ रुपयांनी वाढल्याने सिलिंडरची किंमत ३ हजार ०७९.६४ झाली आहे. तर, पाकिस्तानात पेट्रोलची किमत ३३१.३८ रुपये झाली आहे, तर डिझेल ३२९.१८ रुपयांनी विकले जात आहे.