पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता 31 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ३० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) शनिवारी करदात्यांना पॅन क्रमांक आणि आधार एकमेकांशी लिंक करण्यासाठी दिलेली मुदत पुढील वर्षाच्या मार्चअखेरपर्यंत वाढवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पॅन-आधार लिंक करण्यासाठी आतापर्यंत ३१ जुलै २०१७, ३१ ऑगस्ट २०१७, ३१ डिसेंबर २०१७, ३० जून २०१८ व आता ३१ मार्च २०१९ अशी पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या मार्चअखेरपर्यंत 33 कोटींपैकी 16 कोटी 65 लाख पॅन कार्ड आधारशी लिंक केल्याची माहिती आहे. केंद्र सरकारने बँक खाते, मोबाइल क्रमांक आदींसाठी आधार लिंक करणे अनिवार्य केले आहे. तसेच एलपीजी गॅसमधील अनुदान आणि इतर योजनांचा लाभ मिळवण्यासाठी केंद्रानं केलेल्या आधार सक्तीचं प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. विविध सेवांना आधार लिंक करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचे न्यायालयानं आदेश दिले होते. त्यावेळी सरकारने अतिरिक्त दोन महिने वाढवत 30 जूनपर्यंतची मुदतवाढ दिली होती. आता पुन्हा पुढील वर्षाच्या 31 मार्च 2019पर्यंत ही मुदत वाढवून देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pan card adhar card linking date extended till 31st march
First published on: 01-07-2018 at 08:24 IST