Parliament Session 2025 Operation Sindoor Debate Hightlights: ऑपरेशन सिंदूरवरील चर्चा आजही संसदेत सुरू राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दुपारी लोकसभेत ‘ऑपरेशन महादेव’बद्दल माहिती दिली. पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांना ऑपरेशन महादेव अंतर्गत भारतीय लष्कराने ठार केल्याचे अमित शाह यांनी सांगितले. तसेच अमित शाह यांनी विरोधकांनी काल केलेल्या टीकेला उत्तर दिले. सोमवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेला सुरुवात केली. मंगळवारी रात्री १ वाजेपर्यंत सहभागृह चालले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला उत्तर देत आहेत.

संसदेत होणाऱ्या चर्चेचे लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या…

Live Updates

Parliament Monsoon Session 2025 Hightlights | संसदेचे पावसाळी अधिवेशन २०२५ लाईव्ह अपडेट्स

19:44 (IST) 29 Jul 2025

‘विरांच्या पराक्रमाला जगाचा पाठिंबा मिळाला, पण काँग्रेसचा…’, पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका

Parliament Monsoon Session 2025 : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची घटना आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलाने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात संसदेत चर्चा सुरू आहे. ऑपरेशन सिंदूरसंदर्भात चर्चा पार पडत असताना सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरवरून आणि भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवरून अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यावर आज (२९ जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं. तसेच ऑपरेशन सिंदूरबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर माहिती संसदेत दिली.

सविस्तर वाचा

19:21 (IST) 29 Jul 2025

Parliament Monsoon Session LIVE News Updates: काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष आता पाकिस्तानी अपप्रचाराचे प्रवक्ते झाले - पंतप्रधान मोदी

भारत आता आत्मनिर्भर होत आहे. पण काँग्रेसला मात्र मुद्द्यांसाठी पाकिस्तानवर अवलंबून राहावं लागत आहे. काँग्रेस पाकिस्तानकडून मुद्दे आयात करत आहे. काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष दुर्दैवाने पाकिस्तानच्या अपप्रचाराचे प्रवक्ते बनले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत म्हटले.

19:10 (IST) 29 Jul 2025

Parliament Monsoon Session LIVE News Updates: भारताने पाकिस्तानचे १००० क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स हवेतच नष्ट केले - पंतप्रधान मोदी

भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमची जगभरात चर्चा आहे. आपल्या एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानच्या हल्ल्यांना परतवून लावले. मी आज एक आकडा सांगू इच्छितो, जो ऐकून देशाला गर्व वाटेल. ९ मे रोजी पाकिस्तानने १००० क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सनी हल्ला केला. भारताच्या हवाई दलाने हे सर्व क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स हवेतच नष्ट केले, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत दिली.

18:54 (IST) 29 Jul 2025

Parliament Monsoon Session LIVE News Updates: कोणत्याही जागतिक नेत्याशी चर्चा न करता शस्त्रविराम करण्याचा निर्णय घेतला – पंतप्रधान मोदी

भारताने कोणत्याही जागतिक नेत्याच्या सांगण्यावरून शस्त्रविराम केलेला नाही. ९ मे रोजी रात्री अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी माझ्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मी काही वेळाने त्यांच्याशी बोललो. उपराष्ट्राध्यक्षांनी मला सांगितले की, पाकिस्तान मोठा हल्ला करणार आहे. मी त्यांना ठणकावून सांगितले की, पाकिस्तानने असा काही प्रयत्न केला तर त्यांना महागात पडेल. आम्ही मोठा हल्ला करून त्यांना उत्तर देऊ, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत सांगितले.

18:42 (IST) 29 Jul 2025

Parliament Monsoon Session LIVE News Updates: आम्ही पाकिस्तानच्या नाभीवर हल्ला केला - पंतप्रधान मोदी

आम्ही पाकिस्तानच्या नाभीवर हल्ला केला. ज्याठिकाणी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते, ते तळ आम्ही यावेळी उध्वस्त केले. यावेळीही आपल्या सैन्याने अचूकपणे हे तळ उध्वस्त केले.

18:37 (IST) 29 Jul 2025

Parliament Monsoon Session LIVE News Updates: संयुक्त राष्ट्रासह १९० देशांपैकी फक्त ३ देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला - पंतप्रधान मोदी

ऑपरेशन सिंदूरदरम्यान जगातील कोणत्याही देशाने भारताला स्वसरक्षणाच्या कारवाईपासून रोखले नाही. संयुक्त राष्ट्रातील १९० देशांपैकी फक्त केवळ तीन देशांनी पाकिस्तानच्या बाजूने विधान केले. पण इतर सर्व देशांचे समर्थन भारताला लाभले. जगाचे समर्थन आपल्याला मिळाले. पण दुर्दैव हे आहे की, काँग्रेसचे समर्थन मिळू शकले नाही.

https://www.youtube.com/watch?v=P1N0un5C8e0

18:29 (IST) 29 Jul 2025

Parliament Monsoon Session LIVE News Updates: अणुबॉम्बच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, हे भारताने दाखवून दिले - नरेंद्र मोदी

भारत आणि पाकिस्तान यांच्या अनेकदा संघर्ष उडाला आहे. मात्र यावेळी आपण याआधी जिथे गेलो नव्हतो, तिथे जाऊन हल्ले केले. या हल्ल्यात त्यांच्या हवाई तळांना जबर नुकसान पोहोचवले गेले. यातून हे दाखवून दिले की, भारत यापुढे अणुबॉम्बच्या धमक्यांना घाबरणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

18:20 (IST) 29 Jul 2025

Parliament Monsoon Session LIVE News Updates: ज्यांना भारताची बाजू दिसत नाही, त्यांना आरसा दाखविण्यासाठी तयार - पंतप्रधान मोदी

ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशातील जनतेने मला आशीर्वाद आणि पाठिंबा दिला. याबद्दल सर्व जनतेचे आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे ज्याप्रकारे क्रूर घटना घडली. दहशतवाद्यांनी धर्म विचारून निरपराध लोकांना गोळ्या झाडल्या. हा क्रूरतेचा कळस होता.

18:18 (IST) 29 Jul 2025

Parliament Monsoon Session LIVE News Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच म्हणालो होतो की, संसदेत होणारी ऑपरेशन सिंदूरवरील चर्चा ही आपला विजयोत्सवाची चर्चा असणार आहे. याच विजयी भावनेतून मी संसदेत भारताची बाजू मांडणार आहे.

18:14 (IST) 29 Jul 2025

Parliament Monsoon Session LIVE News Updates: आम्ही पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या घरावरही हल्ला करू शकलो असतो, भाजपा खासदाराचं विधान

भाजपाचे खासदार डॉ. संजय जयस्वाल यांनी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर बोलत असताना म्हटले की, विरोधक काही बोलत असले तरी आम्ही नूर खान हवाई तळावर हल्ला केला, याचा अर्थ आम्ही किराणा हिल्सवरही हल्ला करू शकलो असतो, पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या ठिकाणावरही हल्ला करू शकलो असतो.

18:08 (IST) 29 Jul 2025

Parliament Monsoon Session LIVE News Updates: सीडीएस अनिल चौहान यांचे हात बांधल्याचे त्यांनी मोकळेपणाने सांगायला हवे - राहुल गांधी

लोकसभेत बोलत असताना राहुल गांधी म्हणाले की, माझे हात बांधले गेले होते, हे सीडीएस अनिल चौहान यांनी सांगण्याची हिंमत दाखवावी, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. सशस्त्र दलाला युद्धावर पाठविण्यात आले. पण आपल्याच सरकारने पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ला न करण्याचे आदेश देण्यात आले होते.

18:04 (IST) 29 Jul 2025

Parliament Monsoon Session LIVE News Updates: भारताच्या सशस्त्र दलाने चूक केली नाही, पण राजकीय नेतृत्व चुकले, राहुल गांधींचा आरोप

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय सशस्त्र दलाकडून कोणतीही रणनीतीक चूक झाली नसून भारताच्या नेतृत्वाकडून मात्र चुका झाल्या, असे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले. राजकीय नेतृत्वाच्या चुकांमुळे हवाई दलाची विमाने पाडली गेली, असेही राहुल गांधी म्हणाले.

17:58 (IST) 29 Jul 2025

Parliament Monsoon Session LIVE News Updates: राजकीय नेतृत्वाच्या निर्बंधामुळेच भारतीय हवाई दलाची विमाने पाडली गेली - राहुल गांधींचा आरोप

ऑपरेशन सिंदूरदरम्यान राजकीय नेतृत्वाने भारताच्या सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले नसल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. पाकिस्तानच्या लष्करी आणि हवाई तळांना लक्ष्य न केल्यामुळे भारतीय हवाई दलाने आपली लढाऊ विमाने गमावली, असे राहुल गांधी म्हणाले.

17:46 (IST) 29 Jul 2025

Parliament Monsoon Session LIVE News Updates: इंदिरा गांधींच्या ५० टक्के दम असेल तर पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प खोटारडे असल्याचं संसदेत सांगावं - राहुल गांधी

भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रविराम झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपणच शस्त्रविराम केल्याचे २९ वेळा सांगितले. पण पंतप्रधान मोदींनी एकदाही याचे खंडन केले नाही. माजी पंतप्रधान इंदिरा गांधीच्या तुलनेत त्यांच्यात ५० टक्के जरी दम असेल तर ते आज संसदेत डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलत होते, हे सांगतील, असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले.

17:42 (IST) 29 Jul 2025

Parliament Monsoon Session LIVE News Updates: लष्कराचा पूर्ण क्षमतेने वापर करायचा असेल तर त्यांना स्वातंत्र्य द्यायला हवे - राहुल गांधी

लोकसभेत ऑपरेशन सिंदूरबाबत बोलत असताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले की, जर तुम्हाला सशस्त्र दलाचा वापर करायचा असेल तर १०० टक्के राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे आणि लष्कराला ऑपरेशनचे संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले पाहीजे.

17:30 (IST) 29 Jul 2025

Parliament Monsoon Session 2025 Live Updates: ‘पहलगाममध्ये जे झालं ते दुःखद होतं’, ऑपरेशन सिंदूरवर बोलताना राहुल गांधींनी हल्ल्याचा केला निषेध

लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर बोलण्याचा आजचा दुसरा दिवस आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर बोलत असताना त्यांनी हल्ल्याचा निषेध केला.

16:51 (IST) 29 Jul 2025

"मोदी तर ऑलिम्पिक मेडलचंही श्रेय घेतात, पण फक्त…", प्रियांका गांधींचं पंतप्रधानांवर टीकास्र; शाहांनाही केलं लक्ष्य!

Priyanka Gandhi Speech: प्रियांका गांधींनी लोकसभेत केलेल्या भाषणादरम्यान ऑपरेशन सिंदूरच्या श्रेयवादाचा मुद्दा उपस्थित केला. ...सविस्तर बातमी
16:33 (IST) 29 Jul 2025

Parliament Monsoon Session LIVE News Updates: भाजपाचे खासदार सैन्य दलाचा अवमान करत असताना पंतप्रधान मोदी शांत का राहिले? मल्लिकार्जुन खरगेंचा सवाल

ऑपरेशन सिंदूरवर संसदेत चर्चा सुरू आहे. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. ते म्हणाले, भाजपाचे खासदार सैन्य दलाचा अवमान करत होते, त्यावेळी पंतप्रधान मोदी गप्प का राहिले. तसेच भारताचे पाच लढाऊ विमान पाडण्यात आले, असे ट्रम्प म्हणाले. त्यावरही मोदी शांत का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

16:27 (IST) 29 Jul 2025

पहलगामचे दोषी कुठे आहेत? अमित शाह म्हणाले, "काल राजनाथ सिंहांनी घाबरत-घाबरत सांगितलं, पण मी अधिकृत…"

Amit Shah on Operation Sindoor : अमित शाह म्हणाले, "ऑपरेशन सिंदूरअंतर्गत आपल्या जवानांनी पाकिस्तानमध्ये १०० किमी आत घुसून शत्रूला सडेतोड उत्तर दिलं." ...सविस्तर बातमी
15:28 (IST) 29 Jul 2025

Video: "साहेब, इतिहासावर तुम्ही बोला, मला वर्तमानावर बोलायचंय", प्रियांका गांधींनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं; पहलगाम प्रकरणी विचारले 'हे' सवाल!

Priyanka Gandhi Speech: गांधी कुटुंबीयांनी काँग्रेस सत्ताकाळात काय केलं? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या मुद्द्यांवर प्रियांका गांधींनी लोकसभेत उत्तर दिलं. ...सविस्तर वाचा
15:17 (IST) 29 Jul 2025
Parliament Monsoon Session LIVE News Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अमित शाह यांच्या भाषणाचं कौतुक; म्हणाले, "त्यांचे भाषण..."

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवबाबत माहिती दिली. तसेच विरोधकांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले. अमित शाह यांच्या भाषणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. एक्सवर पोस्ट करत त्यांनी अमित शाहांच्या भाषणाची स्तुती केली.

https://twitter.com/narendramodi/status/1950117830474502619

15:10 (IST) 29 Jul 2025

Amit Shah : "भुट्टोंनी तुम्हाला मूर्ख बनवलं", इंदिरा गांधींना उद्देशून सॅम माणेक शॉ यांनी केलेला उल्लेख अमित शाहांच्या भाषणात; नेमकं काय म्हणाले?

आज लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार भाषण करत ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव बाबत माहिती दिली ...सविस्तर बातमी
15:09 (IST) 29 Jul 2025

Amit Shah : अमित शाह यांची माहिती; "पाकिस्तानमध्ये १०० किमीपर्यंत घुसून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं, ११ हवाई तळ..."

ऑपरेशन सिंदूर राबवून आपण पाकिस्तानचा बदला घेतला. मोदींनी अचूक कारवाई करण्याची मुभा सैन्यदलांना दिली होती. ...वाचा सविस्तर
15:08 (IST) 29 Jul 2025

Amit Shah : अमित शाह यांचं वक्तव्य; "ऑपरेशन महादेव राबवून पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा, आपण.."

ऑपरेशन सिंदूर राबवून मोदींनी दहशतवाद्यांच्या आकांचा बदला घेतला. तर ऑपरेशन महादेवमध्ये पहलगामच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असंही अमित शाह म्हणाले. ...वाचा सविस्तर
15:08 (IST) 29 Jul 2025

"पाकव्याप्त काश्मीरचं अस्तित्व नेहरुंमुळेच", शाहांनी फोडलं खापर; म्हणाले, "पटेल घोषणा करायला गेलेले अन्…"

Amit Shah on POK : अमित शाह म्हणाले, "विरोधक आम्हाला प्रश्न विचारतायत की पाकिस्तानबरोबर युद्ध का केलं नाही? मला त्यांना सांगायचंय की युद्धाचे अनेक परिणाम असतात, त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतात." ...वाचा सविस्तर
15:04 (IST) 29 Jul 2025

Parliament Monsoon Session LIVE News Updates: पहलगाममध्ये सैनिक का नव्हते? प्रियांका गांधींचा सवाल

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये सैनिकांची सुरक्षा व्यवस्था का तैनात नव्हती?, असा सवाल खासदार प्रियांका गांधी यांनी लोकसभेत भाषण करत असताना उपस्थित केला. तसेच पहलगाममध्ये हल्ला होणार आहे, याबाबतची गुप्तवार्ता यंत्रणांना कशी मिळाली नाही, असेही त्या म्हणाल्या.

14:56 (IST) 29 Jul 2025
Priyanka Gandhi Parliament Speech: ‘अमित शाह जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणार का?’, प्रियांका गांधींचा सवाल

प्रियांका गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरची चर्चा संसदेत करत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. अमित शाह यांच्याकडे पद असताना मणिपूरमध्ये आग धुमसत आहे. पहलगामवर दहशतवादी हल्ला झाला, त्यामुळे त्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहीजे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

13:30 (IST) 29 Jul 2025

Amit Shah Parliament Speech LIVE News Updates: गांधी कुटुंबाचे फार पूर्वीपासून चीनवर प्रेम आहे, अमित शाह यांची टीका

अमित शाह लोकसभेत म्हणाले की, आज चीन संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा सदस्य आहे आणि भारत बाहेर आहे. मोदीजी भारताचा या परिषदेत समावेश करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जवाहरलाल नेहरूंमुळेच हे झाले. भारताचे जवान डोकलाम येथे चीनला भीडत होते, तेव्हा राहुल गांधी चिनी दूतावासांबरोबर बैठक घेत होते. गांधी कुटुंबियांना फार पूर्वीपासून चीनचा पुळका आहे.

13:25 (IST) 29 Jul 2025

Amit Shah Parliament Speech LIVE News Updates: ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानचे नागरिक मारले गेले नाहीत, अमित शाह यांची माहिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, ३० एप्रिल रोजी भारताच्या सीसीएस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते. ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले, यात नऊ दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. मात्र या कारवाईत कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाला नाही.

13:17 (IST) 29 Jul 2025
Amit Shah Parliament Speech LIVE News Updates: नेहरूंनी आसामला निरोप दिला होता, अमित शाह यांचा लोकसभेत आरोप

अमित शाह लोकसभेत म्हणाले की, १९६२ च्या चीनविरोधातील युद्धात पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी आकाशवाणीवर भाषण करत असताना आसामला निरोप दिला होता. याचप्रकारे १९४८ च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर नियंत्रण मिळवत वरचढ ठरले असतानाही नेहरूंनी एकतर्फी युद्धबंदी केली.

asaduddin owaisi operation sindoor ceasefire

असदुद्दीन ओवैसींची 'अंकल सॅम'वर टीका! (फोटो - Loksabha Live Screengrab)