मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्य सचिव प्रवीण परदेशी, स्वाधीन क्षत्रिय व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासमवेत मुंबईहून अमेरिकेला जात असताना परदेशी हे त्यांचा व्हिसा विसरल्याने विमान थांबवून ठेवण्यात आल्याच्या प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतल्याच्या वृत्तानंतर आता दोन सहप्रवाशांनी मुख्यमंत्र्यांच्या बाजूने युक्तिवाद केला आहे.
अॅट देव फडणवीस या अंतर्गत दुष्यंत या सहप्रवाशाने म्हटले आहे की, एआय १९१ या विमानाच्या उड्डाणाच्यावेळी आपण मुख्यमंत्र्यांच्या मागे बसलो होतो. त्यांनी कुणालाही फोन केले नाहीत व उड्डाणास विलंब केला नाही, ते फाईल वाचण्यात व्यस्त होते. हे दोन्ही ट्विट फडणवीस यांनी रिट्विट केले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jul 2015 रोजी प्रकाशित
दोन सहप्रवाशांचे फडणवीस यांच्या समर्थनार्थ ट्विट
अॅट देव फडणवीस या अंतर्गत दुष्यंत या सहप्रवाशाने म्हटले आहे की, एआय १९१ या विमानाच्या उड्डाणाच्यावेळी आपण मुख्यमंत्र्यांच्या मागे बसलो होतो.

First published on: 04-07-2015 at 03:59 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers tweet to favor to fadnavis