करोनावर औषध शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना बाबा रामदेव यांनी औषध शोधल्याचा दावा केला होता. पंतजली योगपिठानं हे औषध शोधलं असून, मंगळवारी हे औषध लॉन्च करण्यात आलं. मात्र, बाजारात आणण्याआधीच केंद्र सरकारनं या औषधाच्या विक्रीला विरोध केला होता. त्यानंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं आयुर्वेद विभागाकडून केवळ ताप, खोकला व रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या औषधाचीच परवानगी घेतली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगात आणि देशात करोनानं थैमान घातलं आहे. सगळीकडे रुग्णांची संख्या वाढत असून, देशातील करोना बाधितांचा आकडा साडेचार लाखांपर्यंत गेला आहे. दरम्यान, करोनावरील औषधासाठी जगभरात संशोधन सुरू असताना बाबा रामदेव यांनी करोनावरील औषध शोधल्याचा दावा केला होता. मंगळवारी पतंजलीचं करोनावरील ‘कोरोनिल’ हे आयुर्वेदिक औषध जगासमोर आणण्यात आलं.

आणखी वाचा- पतंजलीच्या करोनावरील औषधासंबंधी आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांचे महत्वाचे विधान

हे औषध सगळ्यांसमोर आल्यानंतर काही तासातच केंद्रीय आयुष मंत्रालयानं त्याच्या जाहिराती बंद करण्याचे आदेश जारी केले होते. “या औषधाची चाचणी होईपर्यंत जाहिरात थांबवण्यात यावी, असं सांगत केंद्र सरकारनं पतंजलीला करोनावरील औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले होते. सध्या केंद्र सरकार या औषधाची चाचणी करत असतानाच पतंजलीला आणखी एक धक्का बसला आहे.

आणखी वाचा- करोनावरील औषधाची जाहिरात थांबण्याचे केंद्राचे आदेश, पण पतंजली म्हणते…

पतंजलीच्या करोनावरील औषधाबद्दल उत्तराखंडच्या आयुर्वेद विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांना खळबळजनक माहिती दिली आहे. पतंजलीनं दिलेल्या अर्जानुसार त्यांना लायसन्स देण्यात आलं. पण, त्यांनी लायसन्सच्या अर्जात कुठेही करोना व्हायरसचा उल्लेख केलेला नव्हता. विभागानं केवळ रोग प्रतिकारक शक्ती, खोकला व ताप यावर औषध बनवण्याचीच परवानगी दिली होती. करोनावर औषध तयार करण्याची परवानगी कशी मिळाली, याबद्दल पतंजलीला नोटीस पाठवून उत्तर मागणार आहे,” असं परवाना अधिकाऱ्यांनं सांगितलं.

आणखी वाचा- करोनावरील औषधाची जाहिरात थांबवा -पतंजलीला केंद्र सरकारचे आदेश

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं करोनावरील आयुर्वेदिक औषध ‘करोनिल’ शोधून काढल्याचा दावा केला आहे. बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या उपस्थितीत हे औषध २३ जून रोजी हरिद्वारच्या पतंजली योगपीठात लाँच करण्यात आलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patanjalis coronil approval application did not mention coronavirus licence officer bmh
First published on: 24-06-2020 at 17:38 IST