एकेकाळी मुंबई गुन्हेगारांच्या ताब्यात होती मात्र शरद पवार यांनी प्रयत्नपूर्वक मुंबईला त्यापासून वाचवले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे गुरुवारी कौतुक केले. पवार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी पवार यांची मुक्तकंठाने स्तुती केली.
पवार यांचे ‘नेटवर्किंग’ कौशल्य वादातीत आहे. त्या दृष्टीनेही ते देशातील सवरेत्कृष्ट राजकारणी आहेत, असे सोनिया गांधी यांनी सांगितले. तर ‘सलाम बॉम्बे-सलाम शरद पवारजी!’ या चार शब्दांत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी त्यांचा गौरव केला. पवार यांनी मात्र आपल्या भाषणात संसदीय कामकाजाचे महत्त्व मांडत हे कामकाज रोखणाऱ्या काँग्रेसलाच एकप्रकारे कानपिचक्या दिल्या.
गुन्हेगारांपासून पवारांनी मुंबईला वाचवले!
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2015 रोजी प्रकाशित
पवारांनी मुंबई वाचवली : मोदी
एकेकाळी मुंबई गुन्हेगारांच्या ताब्यात होती मात्र शरद पवार यांनी प्रयत्नपूर्वक मुंबईला त्यापासून वाचवले
Written by रत्नाकर पवार

First published on: 11-12-2015 at 04:00 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pawar save mumbai pmmodi