पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर नुकताच एका सभेत गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यावरुन ‘पाकिस्तान डेमॉक्रेटिक मुव्हमेंट’चे प्रमुख मौलाना फजलूर रेहमान यांनी खान यांच्यावर निशाणा साधला आहे. “इम्रान खान यांच्यावरील हल्ला हे एक नाटक आहे. अभिनयात त्यांनी शाहरुख आणि सलमान खानलादेखील मागे टाकले आहे”, असा खोचक टोला रेहमान यांनी लगावला आहे. सभेदरम्यान झालेल्या हल्ल्यात खान यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

इम्रान खान यांच्या हल्ल्यामागे आहे गुजरात कनेक्शन? स्वत:च गौप्यस्फोट करत म्हणाले…

“वझिराबाबत प्रकरणाबाबत ऐकल्यानंतर मला इम्रान खान यांच्याविषयी सहानभूती वाटली होती. पण आता हे सर्व नाटक वाटत आहे”, असे रेहमान यांनी म्हटल्याचे वृत्त पाकिस्तानातील ‘डॉन’ या वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे. त्यांनी खान यांना झालेल्या दुखापतीवरदेखील संशय व्यक्त केला आहे. रेहमान हे ‘पीडीएम’सह ‘तेहरीक-ए-इन्साफ’, ‘जमियत उलेमा-ए-इस्लाम फौजल’चे (JUI-F) अध्यक्ष आहेत.

Video : रॅलीवरील गोळीबारानंतर इम्रान खान जखमी, हल्लेखोरास अटक; पाहा हल्ल्यानंतरचे दृश्य

खान यांच्यावर एकपेक्षा अधिक गोळ्या झाडण्यात आल्या का? त्यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे का? याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे रेहमान यांनी सांगितले आहे. खान यांना जवळच्या वझिराबादमधील रुग्णालयात भरती करण्याऐवजी लाहोरला नेण्यात आले, यावरुनही रेहमान यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

“जिंकाल याची…”, दक्षिण अफ्रिकेचा पराभव केल्यानंतर मैदानात बाबर आझम दिसताच नेदरलँडच्या खेळाडूचा संदेश, VIDEO व्हायरल

“बंदुकीच्या गोळीचे तुकडे होणं शक्य आहे का? आम्ही बॉम्बचे तुकडे ऐकले आहेत बंदुकीचे नाही. आंधळ्या लोकांनी खान यांचा खोटारडेपणा स्वीकारला आहे”, अशी टीका रेहमान यांनी केली आहे. गोळीबारात जखमी खान यांच्यावर कॅन्सर रुग्णालयात उपचार का करण्यात आले?, असा सवालही त्यांनी केला आहे. इम्रान खान दुसऱ्यांना चोर म्हणतात, पण आता ते स्वत:च चोर ठरले आहेत, असा हल्लाबोल रेहमान यांनी केला आहे.