करोनामुळे अनेक राज्यात लॉकडाउन लावण्यात आला होता. आता करोनाची दुसरी लाट आता ओसरत आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. लॉकडाउनमध्ये दारूची दुकाने सुद्धा बंद करण्यात आली होती. त्यामुळे तळीरामांची मोठी पंचाईत झाली होती. दरम्यान, तामिळनाडूच्या कोईंबतूरमध्ये दोन महिन्यापासून बंद असलेली दारूची दुकाने पुन्हा उघडण्यात आली आहेत. त्यामुळे लोकांनी आनंद साजरा करण्यासाठी गाण्यावर ठेका धरत चक्क फटाके आणि नारळ फोडले.

कोईंबतूरसह ११ जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णांंची संख्या जास्त असल्याने त्याठीकाणी कडक लॉकडाउन लागू करण्यात आला होता. तसेच या व्यतिरीक्त काही जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे निर्बंध हटविण्यात आले होते. मात्र, ११ जिल्ह्यात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यामुळे नारिकांना घराबाहेर पडायला कोणताही मार्ग नव्हता.

११ जिल्ह्यातील दारूची दुकाने पुन्हा सुरू

रविवारी तामिळनाडूमध्ये ३८६७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. परिस्थिती सुधारत असल्यामुळे राज्य सरकारने लॉकडाउनमध्ये आणखी सुट देण्याची घोषणा केली. यामध्ये कोईंबतूरसह ११ जिल्ह्यातील दारूची दुकाने पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा- video: मद्यप्रेमी नाही मद्यभक्त… त्याने चक्क दारूच्या बाटलीची केली पुजा; जाणून घ्या कारण

तामिळनाडूमध्ये द्रमुक सरकारने दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजकारण तीव्र झाले आहे. भाजपानंतर विरोधी पक्ष एआयडीएमकेनेही या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.