पाकिस्तानातील नेते अकबर बुग्ती यांच्या हत्येप्रकरणी माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना गुरुवारी औपचारिकपणे अटक करण्यात आली. त्यांची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलीये.
बलुचिस्तान पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुशर्रफ यांना अटक केली. बुग्ती यांच्या हत्येप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात जामीन मिळण्यासाठी मुशर्रफ यांनी बलुचिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयात याचिका दाखल केली होती. बुधवारी ही याचिका फेटाळण्यात आली आणि मुशर्रफ यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले. बलुचिस्तान पोलिसांनी केलेल्या विनंतीनुसार इस्लामाबादमधील न्यायालयानेही मुशर्रफ यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आता बलुचिस्तान पोलिस मुशर्रफ यांच्याकडे बुग्ती यांच्या हत्येप्रकरणी चौकशी करणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jun 2013 रोजी प्रकाशित
आता बुग्ती हत्येप्रकरणी परवेझ मुशर्रफ यांना अटक
पाकिस्तानातील नेते अकबर बुग्ती यांच्या हत्येप्रकरणी माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना गुरुवारी औपचारिकपणे अटक करण्यात आली.

First published on: 13-06-2013 at 03:59 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pervez musharraf arrested in akbar bugti murder case