सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी (९ मार्च २०२२ रोजी) देशातील काही शहरांमधील इंधनाच्या दरांमध्ये थोडेफार बदल केलेत. मात्र चार मुख्य मेट्रो शहरांपैकी केवळ चेन्नईमधील दरांमध्ये थोडाफार बदल झालाय. काही राज्यांच्या राजधान्यांच्या शहरांमधील दर किंचित बदलले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेल बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत प्रति बॅरल १३० डॉलर्सपर्यंत पोहचलीय. त्यामुळेच देशात कधीही इंधनदरवाढीचा भडका उडू शकतो अशी भिती व्यक्त केली जातेय. मात्र कंपन्यांनी अद्याप दरवाढ केलेली नाहीय. आज उत्तर प्रदेशमधील नोएडा, लखनऊबरोबरच बिहारची राजधानी पटना आणि हरियाणामधील गुरुग्राम येथील पेट्रोल तसेच डिझेलच्या दरांमध्ये फेरफार केला आहे.

मुख्य चार शहरांपैकी चेन्नई वगळता इतर तीन म्हणजेच दिल्ली, मुंबई आणि कोलकात्यामध्ये इंधनाचे दर जैसे थे आहेत. या शहरांमधील इंधनाचे दर मागील चार महिन्यांपासून स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर लिटरमागे ११० रुपये इतका आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच शहरांमधील दर मुंबईप्रमाणे पूर्वीसारखेच आहेत.

नक्की वाचा >> Petrol-Diesel Prices: “इंधन दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार…”; केंद्रीय अर्थमंत्र्यांचं सूचक वक्तव्य

चार मुख्य शहरांमधील दर खालीलप्रमाणे
दिल्ली – पेट्रोल ९५.४१ रुपये प्रति लिटर, डिझेल ८६.६७ रुपये प्रति लिटर
मुंबई – पेट्रोल १०९.९८ रुपये प्रति लिटर, डिझेल ९४.१४ रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल १०१.४० रुपये प्रति लिटर, डिझेल ९१.४३ रुपये प्रति लिटर
कोलकत्ता – पेट्रोल १०४.६७ रुपये प्रति लिटर, डिझेल ८९.७९ रुपये प्रति लिटर

या शहरांमध्ये बदलण्यात आले दर
गुरुग्राम – पेट्रोल ९५.५९ रुपये प्रति लिटर, डिझेल ८६.८१ रुपये प्रति लिटर
नोएडा – पेट्रोल ९५.७३ रुपये प्रति लिटर, डिझेल ८७.२१ रुपये प्रति लिटर
लखनऊ- पेट्रोल ९५.२८ रुपये प्रति लिटर, डिझेल ८६.८० रुपये प्रति लिटर
पटना – पेट्रोल १०५.९० रुपये प्रति लिटर, डिझेल ९१.०९ रुपये प्रति लिटर
भोपाळ – पेट्रोल १०७.२३ रुपये प्रति लिटर, डिझेल ९०.८७ रुपये प्रति लिटर
हैदराबाद – पेट्रोल १०८.२० रुपये प्रति लिटर, डिझेल ९४.६२ रुपये प्रति लिटर
बंगळुरु – पेट्रोल १००.५८ रुपये प्रति लिटर, डिझेल ८५.०१ रुपये प्रति लिटर
गुवहाटी – पेट्रोल ९४.५८ रुपये प्रति लिटर, डिझेल ८१.२९ रुपये प्रति लिटर
गंधीनगर – पेट्रोल ९५.३५ रुपये प्रति लिटर, डिझेल ८९.३३ रुपये प्रति लिटर
तिरुवनंतपूरम – पेट्रोल १०.३६ रुयपे प्रति लिटर, डिझेल ९३.४७ रुपये प्रति लिटर

जाणून घ्या तुमच्या शहरामधील दर
देशामधील तिन्ही तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसी रोज सकाळी सहा वाजता इंधनाच्या नवीन दरांची घोषणा करतात. या नव्या दरांची माहिती त्यांच्या वेबसाईटवर मिळते. तर दुसरीकडे फोनवरही एसएमएस करुन नवीन दर तपासण्याची सुविधा देण्यात आलीय. 92249 92249 क्रमांकावर एसएमएस पाठवून पेट्रोल डिझेलच्या नवीन दरांबद्दल माहिती मिळवता येते. RSP < स्पेस > पेट्रोल पंप डिलरचा कोड लिहून 92249 92249 वर पाठवावा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol diesel prices today 09 march 2022 rates unchange in most of the cities check full list scsg
First published on: 09-03-2022 at 07:23 IST