चीनमधून आयात अत्यावश्यक, आत्मनिर्भर व्हायला वेळ लागेल; औषध कंपन्यांचं सरकारला साकडं

माल बंदरात अडकला.

गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चिनी सामानावर बहिष्कार घालण्याची, चीनमधून आयात बंद करण्याची मागणी होत आहे. पण सध्या याचा भारतीय औषध कंपन्यांना फटका बसत आहे. भारतीय औषध कंपन्यांनी चीनमधून आयात केलेला माल बंदरात अडकून पडला आहे. त्यामुळे औषध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

भारतीय औषध कंपन्यांनी वरिष्ठ सरकारी कार्यालयं आणि पंतप्रधान कार्यालयाला आयातीला मंजुरी देण्यासाठी साकडं घातलं आहे. औषध निर्मितीसाठी चीनमधून मागवलेला कच्चा माल, द्रव्य, COVID-19 उपकरणे जवाहरलाल नेहरु बंदर आणि दिल्ली विमानतळावर अडकून पडली आहेत. सीएनबीसी टीव्ही १८ ने हे वृत्त दिले.

बंदरामधून हा माल बाहेर निघाला तर औषध कंपन्यांपर्यंत पोहोचू शकतो. पण आवश्यक मंजुरीविना हा माल अजून बंदरामध्येच आहे. आयातील प्राधान्य देऊन झटपट मंजुरी दिली नाही तर ९० ते १०० टक्के उत्पादन कायम ठेवणे कठिण आहे तसेच करोना व्हायरसच्या या संकटकाळात औषध पुरवठयाची साखळी सुद्धा विस्कळीत होईल असे औषध क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. औषध उद्योगाने तात्काळ सरकारी हस्तक्षेपाची मागणी केली आहे. औषध क्षेत्रासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय चांगले आहेत पण आत्मनिर्भर व्हायला वेळ लागेल असे औषध क्षेत्रातील कंपन्यांचे म्हणणे आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pharma industry sends sos to govt on stuck imports from china seeks urgent intervention dmp

ताज्या बातम्या