सोशल मिडियावर सध्या एका कृष्णवर्णीय बाळाचा फोटो फिरत आहे. दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीय बाळाचा फोटो व्हायरल झालायं.
या बाळाला जगातील सर्वात कृष्णवर्णीय बाळं असल्याचं म्हटलयं. विशेष म्हणजे या बाळाच्या डोळ्यातील बुबुळाबाजूचा रंगही काळाचं आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात या बाळाबद्दल कुतूहल निर्माण झालं आहे. या फोटोवर विश्वास ठेवणं थोड कठीण असल्याचे अनेकांचे म्हणणे असून, हे फोटोशॉप किंवा एडिट केल्याचं म्हटलं जातयं. त्यामुळे हे बाळ खरं की खोट हा नेटिझन्सच्या चर्चेचा विषय बनलायं.
अजून एका व्हायरल फोटोमध्ये हे बाळ थोडं मोठ झालेल दिसतं. याचा रंगही सारखाचं आहे. पण हे बाळ तेचं आहे की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येतेयं.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jun 2015 रोजी प्रकाशित
जगातील सर्वात कृष्णवर्णीय बाळावरून नेटिझन्समध्ये चर्चा
सोशल मिडियावर सध्या एका कृष्णवर्णीय बाळाचा फोटो फिरत आहे.

First published on: 13-06-2015 at 03:14 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photo of darkest baby in the world sparks debate whether it was real or fake