Plea in Supreme Court seeks ban on India vs Pakistan Asia Cup 2025 match : आशिया कप स्पर्धेत १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होणार आहे. मात्र या सामन्यावर बंदी घालण मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याचिकेत या समान्याला असंवैधानिक घोषित करण्यात यावे असेही म्हटले आहे. त्यामुळे जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहातात अशा हाय-व्होल्टेज सामन्याचे भवितव्य अनिश्चित झाले आहे.

पण्यातील कार्यकर्त्याकडू याचिका

पुण्यातील सामाजीक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाकल केली आहे. मे महिन्यात २६ लोकांचा मृत्यू झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामने होऊ नयेत, असे याचिकेत म्हटले आहे.

तिरोडकर यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना संविधानाच्या कलम २१ चे उल्लंघन करतो. संविधानाचे कलम २१ हे भारतीय नागरिकांना ‘जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा’ हक्क देते. यामुळे प्रत्येक नागरिकाला सन्मानाने आणि सुरक्षितपणे जगण्याचा अधिकार मिळतो.

या याचिकेतून संविधानाच्या कलम ३२ अंतर्गत आदेश किंवा इतर योग्य रिट देण्याची मागणी करण्यात आली आहे, ज्यामध्ये सरकारला नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स अॅक्ट, २०२५ लागू करण्याचे आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) तात्काळ प्रभावाने नॅशनल स्पोर्ट फेडरेशन (NSF) अंतर्गत आणण्याचे निर्देश द्यावेत असे म्हटले आहे.

तसेच याचिकेत बीसीसीआयला नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स अॅक्ट, २०२५ अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल स्पोर्ट्स बोर्डाने (NSB) घालून दिलेल्या नियम आणि मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणीही केली गेली आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा आपले सैन्य दलांना आणि नागरिकांना ‘आम्ही तुमची पर्वा करत नाहीत’, असा देशविरोधी संदेश देत असल्याचा दावा या याचिकेत केला गेला आहे. दरम्यान शुक्रवारी (१२ सप्टेंबर) भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी होणार आहे. याचा निर्णय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

१४ सप्टेंबर रोजी सामना

आशिया चषक ९ ते २८ सप्टेंबरदरम्यान खेळवला जाणार आहे. आशिया चषकात प्रथमच ८ संघ खेळणार आहेत. या ८ संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. ८ पैकी ४ संघ म्हणजेच दोन्ही गटातून दोन दोन संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील आणि त्यानंतर उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी संघांची निवड होईल. दरम्यान टी -२० फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत असलेल्या या स्पर्धेत भारत – पाकिस्तान सामन्याचा थरार १४ सप्टेंबरला रंगणार आहे. मात्र त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय घेते हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.