केंद्र सरकार दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन पुरवण्याची योजना उज्ज्वला उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी नवीन पॅकेजिंगसह पुन्हा सुरू करणार आहे. पंतप्रधान मोदी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एलपीजीची ही सुविधा महोबा येथून आज दुपारी साडेबारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू करतील. या दरम्यान, ते या योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातून उज्ज्वला २.० योजनेची सुरुवात करणार आहेत. उज्ज्वला २.० अंतर्गत लाभार्थीला मोफत गॅस कनेक्शन तसेच स्टोव्ह आणि पहिल्यांदाच भरलेले सिलेंडरही मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कार्यक्रमात पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहतील. उज्ज्वला योजना आणि जागतिक जैवइंधन दिनानिमित्त एक लघुपटही दाखवला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमृतसर, देहरादून, इंफाळ, उत्तर गोवा आणि गोरखपूर येथे प्रत्येकी एका महिला लाभार्थींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील. त्यानंतर ते कार्यक्रमाला संबोधित करतील.

उज्ज्वला योजना २०१६  मध्ये सुरु करण्यात आली. या दरम्यान, दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कुटुंबांतील पाच कोटी महिला सदस्यांना एलपीजी कनेक्शन देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यानंतर, एप्रिल २०१८ मध्ये महिला लाभार्थ्यांच्या आणखी सात श्रेणींचा समावेश करण्यासाठी या योजनेचा विस्तार करण्यात आला. ८ कोटी एलपीजी कनेक्शनचे उद्दिष्टही वाढवण्यात आले. हे लक्ष्य ऑगस्ट २०१९ मध्ये अगोदर पूर्ण झाले होते.

Ujjwala 2.0 : मोफत एलपीजी कनेक्शनसाठी कसा कराल अर्ज?; जाणून घ्या पात्रता निकष

उज्ज्वला २.० अंतर्गत केंद्र सरकार या आर्थिक वर्षात गरिबांना सुमारे एक कोटी गॅस कनेक्शन मोफत देणार आहे. मोदींनी १ मे २०१६ रोजी उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात या योजनेची सुरुवात केली होती. उज्ज्वला २.० अंतर्गत, ८०० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सिलेंडर आणि स्टोव्ह मोफत पुरवले जाण्याची अपेक्षा आहे असे सांगण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm launches ujjwala yojana 2 beneficiaries will get free stove and lpg refill abn
First published on: 10-08-2021 at 08:25 IST