गेल्या काही दिवसांपासून भारत चीन सीमेवर तणावर पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु भारताकडून तो प्रस्ताव नाकारण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांचं एक मोठं वक्तव्य समोर आलं आहे. ट्रम्प यांनी आपल्या मध्यस्थीच्या प्रस्तावाचा पुनर्रुच्चार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रकरणी चांगल्या मूडमध्ये नसल्याचं वक्तव्य केलं. व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये एक मोठा वाद सुरू आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर करतो. ते एक चांगले व्यक्ती आहेत. भारत आणि चीन या दोन्ही देशांची १.४ अब्ज लोकसंख्या आहे. दोन्ही देशांचं लष्करही ताकदवान आहे.भारत या संपूर्ण प्रकारावरून बिलकुल खुश नाही, तसंच चीनदेखील नाही. जर त्यांनी माझ्याकडे मदत मागितली तर मी नक्कीच मध्यस्थी करेन” असं ट्रम्प यावेळी म्हणाले. “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली आहे. चीनसोबत जे काही सुरू आहे त्यावरून त्यांचा मूड बिलकुल ठीक नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.

मध्यस्थीचा पुनर्रुच्चार

“जर माझ्याकडे मदत मागितली तर मी नक्कीच मध्यस्थी करेन,” असं ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. यापूर्वी ट्रम्प यांनी एक ट्विट करत दोन्ही देशातील वाद कमी करण्यासाठी आपण तयार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, भारतानं ट्रम्प यांचा हा प्रस्ताव नाकारला होता. “आम्ही शांततामय मार्गानं चीनसोबत याप्रकरणी चर्चा करत आहोत,” असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi not in good mood over border row with china says america president donald trump jud
First published on: 29-05-2020 at 07:34 IST