PM Modi speaks to Donald Trump : गाझा येथे युद्धविराम व्हावा, यासाठी शांतता प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्याला इस्रायल आणि हमासने मंजुरी दिली आहे. यामुळे या ठिकाणी दोन वर्षांपासून सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष थांबणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना गाझा शांतता कराराच्या यशासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे, ते म्हणाले की, “मी माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोललो आणि ऐतिहासिक गाझा शांतता योजनेच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच, व्यापार वाटाघाटींमध्ये झालेल्या चांगल्या प्रगतीचा आढावा घेतला. येत्या काही आठवड्यात संपर्कात राहण्याचेही मान्य केले.”

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्याशी देखील फोनवरून संवाद साधला. मोदी म्हणाले की, भारत ओलिसांना सोडवण्यासाठी आणि गाझातील लोकांना मानवतावादी मदत वाढवण्यासंबंधी कराराचे स्वागत करतो. तसेच त्यांनी या गोष्टीवर भर दिला की जगात कुठेही, कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाला स्वीकार केले जाऊ शकत नाही.

याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल वर हमास आणि इस्रारायल यांच्यातील कराराची घोषणा करत म्हटले होते की, गाझामध्ये बंदी बनवलेल्या सर्व लोकांना लवकरच सोडले जाईल आणि इस्रायल शांततेच्या दिशेने पहिले पाऊल टाकत त्यांच्या सैनिकांना एका निश्चित केलेल्या सीमेपर्यंत परत बोलावेल.

जगभरातील नेत्यांचा पाठिंबा

यानंतर जगभरातील नेत्यांनी शांतता प्रस्थापित होण्याची आशा व्यक्त केली आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, “इश्वराच्या मदतीने आम्ही त्या सर्वांना घरी परत घेऊन येऊ.” तुर्कियेचे राष्ट्राध्यक्ष रजब तैयब एर्दोआन यांनी देखील या कराराचे समर्थन केले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत राजकीय इच्छाशक्ती दाखवल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत, याबरोबरत कतार आणि इजिप्त यांचे देखील करारात मदत केल्याबद्दल आभार मानले आहेत.

एर्दोआन म्हणाले की, मी आपल्या पॅलेस्टिनी भाऊ आणि बहि‍णींनी शुभेच्छा देतो ज्यांनी दोन वर्षांपर्यंत खूर दुख: सहन केले आहे.” तुर्कियेच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील म्हणटले आहे की मानवीय मदत पाठवणे त्यांची प्राथमिकता आहे. त्यांनी गाझा पुन्हा तात्काळ उभे करण्याच्या गरजेवरही भर दिला.

इजिप्तकडून ऐतिहासिक क्षण असा उल्लेख

इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आब्देल-फतह अल-सिसी यांनी इस्रायल आणि हमास यांच्या दरम्यान झालेल्या कराराला ऐतिहासिक क्षण म्हटले आहे. अल-सिसीने सोशल मीडियावर लिहिले की, हा करार फक्त युद्धाचा अध्याय संपवत नाही; तर या भागातील लोकांसाठी भविष्यातील आशेचे दरवाजे देखील खुले करतो.

चीनने देखील गाझामध्ये स्थायी आणि व्यापक युद्धविरामाची आशा व्यक्त केली आहे. चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गुओ जियाकुन म्हणाले की शी जिनपिंग सरकारला आशआ आहे की हा करार गाझातील मानवीय संकट कमी करेल आणि पश्चिम आशियामध्ये तणाव कमी करेल. त्यांनी असेही म्हटले की चीन 2 स्टेट सॉल्यूशनचे समर्थन करतो. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, हा करार ओलीस आणि त्यांच्या परिवारांसाठी, गाझामध्ये पॅलेस्टिनी आणि संपूर्ण भागासाठी एक मोठी आशा आहे.

सौदी अरेबियांने युद्ध विरामाचा शक्यतेचे स्वागत केले आहे आणि परराष्ट्र मंत्रालयाने आशा व्यक्त केली आहे की या महत्त्वाच्या पाऊलामुळे गाझा पट्टीमध्ये पॅलेस्टिनी लोकांची मानवीय वेदना कमी करण्यासाठी तात्काळ कारवाई, इस्रायलची पूर्ण वापसी, संरक्षण आणि स्थिरता आणण्यासाठी व्यावहारिक उपायांच्या सुरवातीचा मार्ग सुकर होईल.

यूक्रेनचे राष्ट्रध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की, डॉर्डनचे उप-पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री अयमान सफादी, लेबनानचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ ओउन, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, नेदरलँड्सचे परराष्ट्रमंत्री डेविड वान वील, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी, अर्जेंटीनाचे राष्ट्राध्यक्ष जेव्हियर मिलेई, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज आणि जपान सरकारने देखील या कराराचे स्वागत केले आङे.