पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शासकीय पदावर कार्यरत होऊन आज २० वर्षे पूर्ण झाली आहेत. आजपासून (७ ऑक्टोबर) २० वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली होती. “२० वर्षांपूर्वी याच दिवशी मला जनतेची सेवा करण्याची नवी जबाबदारी मिळाली. लोकांची सेवा करण्याचा, लोकांमध्ये राहण्याचा माझा प्रवास अनेक दशकांपूर्वी सुरु झाला होता. परंतु, आजच्या दिवशी २० वर्षांपूर्वी मला गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून नवीन जबाबदारी मिळाली होती”, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान कार्यालयाने याबाबतचं ट्विट केलं आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मोदींवर आता भाजपा नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Oct 2021 रोजी प्रकाशित
मोदींनी सक्रीय राजकारणात पूर्ण केली २० वर्षे; भाजपा नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आता भाजपा नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 07-10-2021 at 13:45 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi completes 20 years in public office gst