पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नमकहराम असं म्हणत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या मजुरांना गुजरातमध्ये मारहाण करण्यात आली. गुजराती समाजाने त्यांच्यावर एवढा अन्याय केला की हे मजूर लोक गुजरात सोडून पळाले. असं असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी याविरोधात एक शब्दही बोलायला तयार नाहीत. या नमकहराम माणसाला ओळखा असं आवाहन जिग्नेश मेवाणी यांनी केलं आहे. २५ तारखेला झालेल्या एका रॅलीदरम्यान जिग्नेश मेवाणी बोलत होते. त्यांनी पंतप्रधानांवर टीका करताना आपली मर्यादा सोडली आहे. गुजराती समाजाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समजावयला हवं होतं की तुम्ही करताय ते योग्य नाही. मजुरांना मारहाण करणं बंद करा, मात्र ते एक शब्दही बोलले नाहीत असाही आरोप जिग्नेश मेवाणी यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

नेमकं काय म्हटले जिग्नेश मेवाणी?

मित्रांनो, युपी आणि बिहारमधील गरीब आणि कष्टकरी मजुरांना गुजरातमध्ये मारहाण झाली. त्यांच्याबरोबर गैरवर्तवणूक झाली. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक ओळही बोलण्यास तयार नाहीत. त्यांनी गुजराती समाजाला आवाहन करायला हवं होतं की यूपी आणि बिहारचे मजूर हे आपले बांधवच आहेत. त्यांच्यासोबत जी गैरवर्तणूक करत आहात ती बंद करा, मात्र ते असं काहीही म्हटले नाहीत. म्हणूनच या नमकहरामाला ओळखा.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi is namakharam says jignesh mewani
First published on: 26-10-2018 at 18:10 IST