विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव कसा करता येईल, याचा विचार करतात. पण, बकऱ्या आणि जंगलातील प्राणी एकत्र येऊन सिंहाशी लढू शकत नाहीत. जंगलाचा राजा सिंहच असतो. २०१४ आणि २०१९ सालीही विरोधक एकत्र आले होते. पण, ४०० खासदार निवडून येणारी काँग्रेस ४० जागांवर आली, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. ते श्रीनगर येथे ‘एबीपी न्यूज’शी बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “जनता पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर आहे. कारण, मोदी भारताला महासत्तेकडे घेऊन जात आहेत. जी-२० शिखर परिषदेच्या बैठकीला अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, युरोप आणि अन्य देशातील नेते उपस्थित होते. या नेत्यांबरोबर पंतप्रधान मोदींचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे भारताचा दबदबा पूर्ण जगात निर्माण झाला आहे.”

“जाणूनबुजून ईडी कोणावरही छापेमारी करत नाही”

ईडी आणि सीबीआय फक्त विरोधी पक्षांवर छापे टाकते. पण, एमआयएमला सरकार हातही लावत नाही, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटल्याबाबत एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, “भ्रष्टाचार करणाऱ्यांवर ईडी छापे टाकते. ज्यांनी काही केलं नाही, त्यांनी भीती कशाला बाळगावी. जाणूनबुजून ईडी कोणावरही छापेमारी करत नाही.”

हेही वाचा : “एकदा लोकसभेची निवडणूक होऊद्या, तुमच्या प्रत्येक…”, भाजपा आमदाराचा श्रीकांत शिंदेंना इशारा

“अनेकांनी काश्मीरमध्ये येऊन व्यवसाय सुरू केला”

“अखंड भारत हे मोदींचं स्वप्न आहे. दहशतवादाला मुळातून नष्ट करण्याची ताकद फक्त मोदींमध्ये आहे. कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये शाळा सुरु झाल्या, लोकांचं जनजीनव सुरळीत झालं. अनेकांनी काश्मीरमध्ये येऊन व्यवसाय सुरू केला. पुढील वर्षी काश्मीरमधील रेल्वेचं काम पूर्णत्वास जाईल,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

हेही वाचा : “धनुष्यबाणापेक्षा रॉकेट चालतात”, भाजपा आमदाराच्या वक्तव्यावर शिंदे गटातील मंत्री प्रत्युत्तर देत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महाराष्ट्रात आम्हाला भीती नाही”

“महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार होतं. आता अजित पवारही आमच्याबरोर आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आम्हाला भीती नाही. २१५ हून अधिक आमदार आमच्याबरोबर आहेत. शेतकरी, माता-भगिनी, तरूणांना न्याय देण्याचं काम आम्ही केलं. अडीच वर्षे कोणतीही काम झाले नाहीत. पूर्ण अहंकाराने भरलेली लोक होती,” अशी टीका एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.