पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विश्वकर्मा जयंती’निमित्त ‘पंतप्रधान विश्वकर्मा योजना’ सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून १८ व्यवसायांना फायदा होणार आहे. योजनेसाठी १३ हजार कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ‘पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरूवात करण्याची संधी मला मिळाली, याचा आनंद आहे. ही योजना कलाकार आणि कारागिरांसाठी आशेचा किरण म्हणून उदयास येईल,’ असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सोनार, लोहार, कुंभार, चांभार, नाभिक यांसारख्या पारंपारिक कौशल्ये असलेल्यांना लाभ मिळणार आहे. योजनेअंतर्गत पारंपारिक कौशल्याची कामे करणाऱ्यांना पहिल्या टप्प्यात १ लाख आणि दुसऱ्या टप्प्यात २ लाखांचं कर्ज दिलं जाईल.

हेही वाचा : दिल्ली मेट्रोत पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा; तरुणीने संस्कृतमधून दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “जेव्हा बँक ( पारंपारिक कौशल्ये असलेले व्यवसायिक ) हमी देत नाहीत, तेव्हा मोदी तुमची हमी देतो. विना हमीपत्राशिवाय ३ लाख रूपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. या योजनेचं व्याज कमी राहणार आहे. पहिल्यांदा १ लाखांचं कर्ज देण्यात येईल. हे कर्ज फेडल्यानंतर आणखी २ लाखांचं कर्ज दिलं जाईल. तसेच, आता सरकार विश्वकर्मा सहकाऱ्यांचं मार्केटिंगही करणार आहे.”

हेही वाचा : “काँग्रेसनं वृत्तनिवेदकांवर बहिष्कार टाकण्यापेक्षा…”, राहुल गांधींचा उल्लेख करत भाजपाची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विश्वकर्मा योजनेत १८ व्यवसायांचा समावेश

केंद्र सरकारने विश्वकर्मा योजनेत १८ पारंपारिक कौशल्य असलेल्या व्यवसायांचा समावेश केला आहे. या योजनेमुळे भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील कलाकार आणि कारागिरांना मदत होणार आहे. योजनेत रंगरंगोटी करणारे, नाभिक, होडी बनवणारे, लोहार, कुलूप तयार करणारे, सोनार, कुंभार, मुर्तिकार, माशांचं जाळ बनवणारे, खेळणे तयार करणाऱ्यांसह अन्य काहींचा समावेश आहे.