पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवस अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेत पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसला भेट दिली. यावेळी केलेल्या भाषणातून नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी ३ दशकांपूर्वीची एक जुनी आठवण सांगितली आहे.

नरेंद्र मोदी यांनी व्हाईट हाऊस येथे केलेल्या भाषणात म्हणाले, “आज व्हाइट हाऊसमध्ये शानदार स्वागत झालं. हा १४० कोटी देशवासीयांचा सन्मान आणि गौरव आहे. हा सन्मान अमेरिकेत राहणाऱ्या चार लाखाहून अधिक भारतीय वंशाच्या नागरिकांचा आहे. या सन्मानासाठी जो बायडेन यांचं मी मनपूर्वक आभार मानतो.”

हेही वाचा- व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘We The People’ चा नारा! भाषणात लोकशाहीचा उल्लेख करत म्हणाले…

दरम्यान, ३० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले, “तीन दशकांपूर्वी एक सामान्य नागरिक म्हणून मी अमेरिका दौऱ्यावर आलो होतो. तेव्हा मी व्हाईट हाऊसला बाहेरून बघितलं होतं. पंतप्रधान बनल्यानंतर मी स्वत: इथे अनेकदा आलो आहे. पण एवढ्या मोठ्या संख्येनं भारतीय-अमेरिकन समुदायासाठी व्हाईट हाऊसचे दरवाजे आज पहिल्यांदा उघडले आहेत. अमेरिकेत राहणारे भारतीय वंशाचे नागरिक आपलं कौशल्य, कर्म आणि निष्ठेनं भारताची प्रतिष्ठा वाढवत आहेत. तुम्ही सर्वजण भारत-अमेरिकेच्या संबंधातील खरी ताकद आहात. आज तुम्हाला दिलेल्या सन्मानासाठी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांना हृदयापासून धन्यवाद देतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दोन्ही देशातील समाज आणि व्यवस्था लोकशाही मूल्यांवर अधारित आहे. दोन्ही देशांच्या संविधानातील पहिले तीन शब्द ‘we the people’ असे आहेत. अमेरिका आणि भारत हे दोन्ही देशांना आपल्या विविधतेचा अभिमान आहे,” असंही नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.