संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी व विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवर आमने-सामने आल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून आलं आहे. पण राज्यसभेतून निवृत्त होत असलेल्या सदस्यांच्या आभार प्रदर्शन प्रस्तावावर बोलताना मात्र दोन्ही बाजूच्या सदस्यांनी कार्यकाळ संपलेल्या सर्वपक्षीय सदस्यांसाठी गौरवोद्गार काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी देशाचे माजी पंतप्रधान व काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार मनमोहन सिंग यांच्या जीवनमूल्यांचा आदर्श सगळ्या खासदारांनी घेतला पाहिजे, अशा शब्दांत त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी आपल्या भाषणात मोदींनी मनमोहन सिंग गेल्या वर्षी व्हीलचेअरवर बसून राज्यसभेत आल्याच्या प्रसंगाचा उल्लेख केला. “लोकसभेत काही दिवसांपूर्वी मतदानाचा एक प्रसंग होता. कशासाही हे मला आठवत नाही. हे स्पष्ट होतं की या मतदानानंतर विजय सत्ताधाऱ्यांचा होणार आहे. बाजूने व विरोधात असणाऱ्या मतांमध्ये अंतर खूप होतं. पण डॉ. मनमोहन सिंग व्हीलचेअरवर आले, मतदान केलं. एक खासदार आपल्या जबाबदाऱ्यांसाठी किती जागृत आहे याचं हे प्रेरणादायी उदाहरण होतं”, असं मोदी म्हणाले. “ते कोणत्या पक्षासाठी आले होते हे महत्त्वाचं नाहीये. मी असं मानतो की ते लोकशाहीला बळ देण्यासाठी आले होते”, असंही मोदींनी भाषणात नमूद केलं.

Maliwal letter to India Aghadi appeals to discuss the attack case
‘इंडिया’ आघाडीला मालिवाल यांचे पत्र; हल्ला प्रकरणावर चर्चा करण्याचे आवाहन
vote counting center mobile phones marathi news
मतमोजणी केंद्रात मोबाइल नेल्याप्रकरणी उमेदवाराच्या प्रतिनिधीसह दोघांविरोधात गुन्हा, एक आरोपी नवनिर्वाचित खासदाराचा नातेवाईक
Nitin Gadkari arrived in Nagpur after being inducted into the cabinet for the third time
मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर गडकरी नागपुरात, म्हणाले ”  प्रेमाची परतफेड …”
Rahul urged to become Leader of Opposition Sonia Gandhi as President of Congress Parliamentary Party
राहुल यांना विरोधी पक्षनेते होण्यासाठी आग्रह;काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी
Discussion of Devendra Fadnavis with Sangh office bearers
संघ पदाधिकाऱ्यांबरोबर फडणवीसांची चर्चा; चर्चेनंतर लगेच दिल्लीकडे रवाना
sharad pawar supriya sule
जुन्या मित्रांबरोबर लवकरच चर्चा; निकालानंतर राहुल गांधी यांची घोषणा, खरगे यांचा मोदींवर हल्लाबोल
congress orders 100 kg laddoo news
Loksabha Poll 2024 : निकालापूर्वी काँग्रेसकडून जल्लोषाची तयारी; १ क्विंटल लाडूची दिली ऑर्डर
Modi attacks congress in himachal pradesh
मदत निधीच्या आरोपावरून भाजपा-काँग्रेसमध्ये जुंपली; पंतप्रधान मोदींच्या दाव्यात किती सत्य?

नेमकं तेव्हा काय घडलं होतं?

मोदींनी उल्लेख केलेला प्रसंग ८ ऑगस्ट २०२३ रोजीचा आहे. लोकसभेत मंजुरीनंतर राज्यसभेमध्ये दिल्ली सेवा विधेयकावर मतदान होणार होतं. या विधेयकानुसार दिल्लीतील प्रसासकीय अधिकाऱ्यांबाबतचे अधिकार केंद्र सरकारच्या हाती जाणार होते. हे विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी मांडण्यात आलं. विधेयकावरील चर्चा व मतदानासाठी काँग्रेसनं ४ ऑगस्ट रोजीच सर्व सदस्यांना उपस्थित राहण्याचा व्हिप बजावला होता. ८ ऑगस्ट रोजी मनमोहन सिंग मतदानात सहभाग घेण्यासाठी प्रकृती अस्वास्थ्यामुळे व्हीलचेअरवर राज्यसभेत दाखल झाले.

त्यावेळी राज्यसभेतल्या ७ जागा रिक्त होत्या. २३३ सदस्यांनी मतदानात सहभाग घेतला. त्यात मनमोहन सिंग यांचाही समावेश होता. भाजपासह एनडीएकडे १११ सदस्यांचं संख्याबळ होतं. बिजू जनता दल व वायएसआर काँग्रेसकडे प्रत्येकी ९ सदस्यांची मतं होती. त्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केलं. इतर दोन सदस्यांनीही विधेयकाच्या बाजूने मत दिलं. तर विरोधकांची इंडिया आघाडी व के. सी. राव यांच्या भारत राष्ट्र समितीचे मिळून १०५ सदस्यांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. त्यावेळी आपच्या संजय सिंह यांना त्याआधीच निलंबित केल्यामुळे विरोधकांचं संख्याबळ १०६ वरून १०५वर आलं होतं.

Video: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मनमोहन सिंग यांच्यासाठी गौरवोद्गार; म्हणाले, “त्या दिवशी ते लोकशाहीसाठी संसदेत आले होते!”

भाजपाची टीका!

दरम्यान, मनमोहन सिंग व्हीलचेअरवर राज्यसभेत दाखल झाल्याचा फोटो एक्सवर (ट्विटर) शेअर करत भाजपाच्या अधिकृत हँडलवरून काँग्रेसला लक्ष्य करण्यात आलं. “देश काँग्रेसची ही सनकी वृत्ती लक्षात ठेवेल. काँग्रेसनं सभागृहात देशाच्या माजी पंतप्रधानांना रात्री उशीरापर्यंत अशा अवस्थेतही व्हीलचेअरवर बसवून ठेवलं. आणि हे कशासाठी, तर आपली बेईमान आघाडी जिवंत ठेवण्यासाठी. निव्वळ लाजिरवाणा प्रकार”, असं या पोस्टमध्ये भाजपानं म्हटलं होतं.

मनमोहन सिंग यांनी व्हीलचेअरवर राज्यसभेत प्रवेश केल्यावरून त्यावेळी सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला होता. सत्ताधाऱ्यांकडून या प्रकारावर तीव्र शब्दांत टीका करण्यात आली होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याच प्रसंगाचा उल्लेख करून मनमोहन सिंग यांच्यासाठी गौरवोद्गार काढले.