भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमधल्या कलबुर्गी जिल्ह्यात पारंपरिक वाद्य असलेला ढोल वाजवला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत होते. मुंबईतल्या विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. मुंबईत येण्याआधी ते कलबुर्गी या ठिकाणी होते.

काय म्हणाले पंतप्रधान?

कर्नाटक सरकारने सुशासन आणि समरसता या दोहोंचा मार्ग निवडला आहे. भगवान बसवेश्वरांनी शतकांपूर्वी हा मार्ग देशाला दाखवला होता. कर्नाटक सरकारची वाटचाल त्याच मार्गावर सुरू आहे. समाजातील प्रत्येक भेदभावाच्या वर जात समाजाला सक्षम करणारा हा मार्ग आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

कलबुर्गी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जनसभा

कलबुर्गी या ठिकाणी एक जनसभा आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी बंजारा समुदायाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. बंजारा समाजासाठी आजचा दिवस खूप मोठा आहे कारण हक्कू पत्राद्वारे ५० हजारांहून अधिक लोकांना आपल्या घराचा हक्क मिळाला आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या पा जिल्ह्यांमध्ये असलेल्या घुमंतू लंबाती या बंजारा समुदायासाठी त्यांच्या हक्काचं घर देणाऱ्या हक्कू पत्राचं वाटप केलं त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कलबुर्गी या ठिकाणी बंजारा समाजाला केलं संबोधित

या समाजाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की तुमची संस्कृती, परंपरा आणि खाद्य परंपरा हे सगळं भारताची ताकद आहे. तुमच्या प्रत्येक सुविधांसाठी आपलं सरकार कटीबद्ध आहे. लंबानी बंजारा समुदाय हा त्यांच्या विशिष्ट पोशाख आणि भाषेसाठी ओळखला जातो. या समुदायाला संबोधित करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ढोल वाजवला. तुमच्या रूपाने देशाची एक संस्कृती समृद्धी झाली आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.