निवडणुकीदरम्यान देशातील राजकीय नेते ऐकमेकांवर कितीही राजकीय चिखलफेक करत असले तरी त्यांचे वैयक्तिक संबंध हे राजकारणापलीकडे असतात. संकटाच्या काळात हे राजकीय नेते अनेकदा विरोधीपक्षातील नेत्यांच्या मदतीला धावून जातात, याचा प्रत्यय आपल्याला वेळवेळी येत असतो. असाच एक किस्सा पंतप्रधान मोदी यांनी सांगितला आहे, ज्यावेळी त्यांनी राजकारणापलीकडे जाऊन सोनिया गांधी यांची मदत केली होती.

पंतप्रधान मोदी यांनी नुकताच न्यूज १८ नेटवर्कला मुलाखत दिली. यावेळी त्यांना जेपी नड्डा यांच्या काँग्रेस नेत्यांच्या मुलीच्या निधानानंतर त्यांच्या घरी भेट देण्याच्या निर्णयाबाबत विचारण्यात आलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, जेपी नड्डा यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही. ते कर्नाटकात एका कार्यक्रमासाठी गेलेला असताना ही घटना घडली. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने त्यांनी काँग्रेस नेत्याच्या घरी भेट दिली. खरं तर अशावेळी कोण कोणत्या पक्षाचा आहे. याचा विचार आम्ही करत नाही. असा विचार करण्याची करण्याची आमची मानसिकता नाही.

हेही वाचा – “मोदी सरकारचं गुजरातप्रेम अन् महाराष्ट्राविषयी असलेला द्वेष…”, कांदा निर्यातीवरील बंद…

पुढे बोलताना त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मदतीचा प्रस्ताव दिला होता, तेव्हाची आठवणही सांगितली. ते म्हणाले, मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना दमणमध्ये सोनिया गांधी आणि अहमद पटेल यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. त्यानंतर मी लगेच अहमद पटेल यांना फोन करून एअर ॲम्ब्युलन्स पाठवत असल्याचे सांगितले. मात्र, सर्वकाही ठीक असून दोघेही सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच वाराणसीत जेव्हा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, तेव्हाही अधिकाऱ्यांना पाठवल्याचे त्यांनी सांगितले. एकदा निवडणूक प्रचारादरम्यान वाराणसीत सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली होती. त्यावेळी मी लगेच अधिकाऱ्यांना पाठवून त्यांची विचारपूस करण्याचे सांगितले होते. तसेच आवश्यक असल्यास त्यांना हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले होते, असे ते म्हणाले.