१९५२ मध्ये चित्ता भारतातून नामशेष झाले होते. आता पुन्हा एकदा भारताची भूमी चित्यांनी भरली आहे. त्यांचे नवीन निवासस्थान मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय वन उद्यान बनले आहे. नामिबियातील आठ चित्ते आज पहाटे एका विशेष विमानातून ग्वाल्हेरच्या महाराजा विमानतळावर पोहोचले आणि त्यानंतर हे सर्व चित्ते लष्कराच्या तीन विशेष हेलिकॉप्टरने कुनो राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले. वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी ११.३० च्या सुमारास लीव्हर खेचून तीन चित्ते उद्यानात सोडले. सर्व चित्ते काही दिवस विशेष बंदोबस्तात राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येथील हवा-पाण्याची आणि वातावरणाची सवय झाल्यानंतर त्यांना जंगलात सोडण्यात येईल.
चित्त्यांना सोडल्यानंतर पीएम मोदी म्हणाले की, मी नामिबिया सरकारचे आभार मानतो. हे ऐतिहासिक क्षण आहेत की आज चिते भारताच्या भूमीत परतले आहेत. ते म्हणाले की, भूतकाळ आपल्याला उज्ज्वल भविष्याची संधी देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लीव्हर खेचून चित्त्यांना उद्यानात सोडले. लीव्हर खेचून त्यांनी आठपैकी फक्त तीनच चित्ता उद्यानात सोडले. कुनो नॅशनल पार्कचे प्रशासन उर्वरित पाच चित्ता सोडणार आहे. चित्ता सोडल्यानंतर पीएम मोदी फोटोग्राफी करतानाही दिसले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते.
( हे ही वाचा: Namibian Cheetahs : नामशेष झालेल्या चित्त्याचे तब्बल ७० वर्षांनंतर भारतात पुन्हा आगमन; पाहा नवा Video)
पहा व्हिडीओ
( हे ही वाचा : Cheetah in India : तब्बल ७५ वर्षांनी नामशेष झालेला चित्ता भारतात पुन्हा पाहायला मिळणार; त्यांचा पहिला व्हिडीओ आला समोर)
देशवासीयांना संयम दाखवावा लागेल
पीएम मोदी म्हणाले, “आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, भारत या चित्तांचा पुनर्वसन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडलेले चित्ते पाहण्यासाठी देशवासीयांना काही महिने वाट पाहावी लागेल. आज हे चित्ते पाहुणे म्हणून आले आहेत, त्यांना या परिसराची माहिती नाही. या चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये आपले घर बनवता यावे, यासाठी आम्हाला या चित्त्यांनाही काही महिन्यांचा वेळ द्यावा लागेल.”
( हे ही वाचा: तब्बल ७० वर्षांनी भारतात पाहायला मिळणार चित्ता; PM मोदींना वाढदिवशी मिळणार ग्रेट भेट)
“हे दुर्दैव आहे की आम्ही १९५२ मध्ये देशातून चित्ते नामशेष झाल्याचे घोषित केले”
पुढे पीएम असंही म्हणाले, “हे दुर्दैव आहे की आम्ही १९५२ मध्ये देशातून चित्ते नामशेष झाल्याचे घोषित केले, परंतु अनेक दशकांपासून त्यांच्या पुनर्वसनासाठी कोणतेही अर्थपूर्ण प्रयत्न केले गेले नाहीत. आज स्वातंत्र्याच्या अमृतात आता देशात नव्या ऊर्जेने चितांचे पुनर्वसन होऊ लागले आहे. निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण झाले की आपले भविष्यही सुरक्षित असते हे खरे आहे. विकासाचे आणि समृद्धीचे मार्गही खुले होतात. कुनो नॅशनल पार्कमध्ये जेव्हा चित्ता पुन्हा धावतील, तेव्हा येथील गवताळ प्रदेशाची परिसंस्था पुन्हा पूर्ववत होईल.