केरळमध्ये आजपासून (२५ एप्रिल) देशातली पहिली वॉटर मेट्रो धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. देशातील ही पहिलीच मेट्रो असेल जी रुळांवर नाही तर पाण्यावर धावणार आहे. या प्रकल्पाद्वारे कोची आणि शहराच्या आसपासची बेटं जोडली जातील. हा प्रकल्प कोची आणि आसपासच्या लोकांसाठी आणि जगभरातील पर्यटकांना सुरक्षित आणि खिशाला परवडणारा प्रवास प्रदान करेल.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आठ इलेक्ट्रिक हायब्रिड बोटींसह वॉटर मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात हायकोर्ट-वायपिन टर्मिनल आणि व्यित्तला-कक्कनड टर्मिनल दरम्यान वॉटर मेट्रो धावेल. हायकोर्ट-वायपिन टर्मिनलदरम्यानच्या प्रवासासाठी प्रवाशांना २० रुपये तर व्यित्तला-कक्कनड टर्मिनल प्रवासासाठी प्रवाशांना ३० रुपये मोजावे लागतील. माफक दरात प्रवासी वातानुकूलित वॉटर मेट्रोने प्रवास करू शकतील.
जाणून घ्या भारताल्या पहिल्या वॉटर मेट्रोबद्दल
रेल्वे आणि रस्ते वाहतुकीपेक्षा वॉटर मेट्रो अधिक ऊर्जा कार्यक्षम आहे. लोकांची वाहतूक कोंडीपासून सुटका, प्रदूषण कमी होणार.
पहिल्या टप्प्यात कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या अंतर्गत आठ इलेक्ट्रिक हायब्रिड बोटी धावणार
वॉटर मेट्रोद्वारे कोची शहर आणि आसपासची १० बेटं जोडली जाणार
या प्रकल्पाअंतर्गत आगामी काळात ३८ टर्मिनल्सवर ७८ इलेक्ट्रिक बोटी धावतील.
पहिल्या टप्प्यात हायकोर्ट-वायपिन टर्मिनल आणि व्यित्तला-कक्कनड टर्मिनल दरम्यान वॉटर मेट्रो धावेल.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले की, प्रवासी कोणत्याही वाहतूक कोंडीचा सामना न करता अवघ्या २० मिनिटांपेक्षा कमी वेळात हायकोर्ट टर्मिनल ते वायपिन टर्मिनलपर्यंत पोहोचू शकतात.
हायकोर्ट-वायपिन टर्मिनलदरम्यानच्या प्रवासासाठी प्रवाशांना २० रुपये तिकीट असेल.
व्यित्तला-कक्कनड टर्मिनलदरम्यान प्रवासासाठी प्रवाशांना ३० रुपये मोजावे लागतील.