दिल्लीतील सत्र न्यायालयात गोळीबाराची घटना घडली. गोळीबारात एका पोलीस कर्मचाऱयाचा मृत्यू झाला असून, तिघे जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील कडकडडूमा न्यायालयाच्या रुम नं. ७३ मध्ये ही घटना घडली. महानगर दंडाधिकारी सुनील गुप्ता एका गँगस्टरच्या खटल्यावर निर्णय देत असताना हा गोळीबार झाला. त्यामध्ये राम कुमार या एका पोलीस कर्मचाऱयाला तीन गोळ्या लागल्या, तर न्यायालयातील दोन कर्मचारी आणि एक व्यक्ती जखमी झाला. राम कुमार यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. कोर्टरुममधून पोलिसांनी एक पिस्तूल हस्तगत केले असून, कोर्टरुमच्या शौचालयात देखील एक पिस्तूल पोलिसांना सापडल्याचे समजते. दोन गटांतील द्वेषामुळे हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2015 रोजी प्रकाशित
दिल्लीतील न्यायालयात गोळीबार, एका पोलीस कर्मचाऱयाचा मृत्यू
राम कुमार या एका पोलीस कर्मचाऱयाला तीन गोळ्या लागल्या, तर न्यायालयातील दोन कर्मचारी आणि एक व्यक्ती जखमी झाला.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड
Updated:
First published on: 23-12-2015 at 14:16 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police constable killed three others injured after firing in delhi court