येथील कबीर चौरा मठ परिसरातील शासकीय रुग्णालयाच्या संकुलात विशेष कृती दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या चकमकीत एक कुख्यात गुंड ठार झाला. त्याच्यावर ५० हजार रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.
सदर गुंडाचे नाव रोहित ऊर्फ सनी सिंह असे असून तो अन्य टोळीतील गुंडांना भेटण्यासाठी शासकीय रुग्णालयाच्या संकुलात आल्याची खबर पोलिसांना मिळाली. तेव्हा पोलिसांनी या संकुलास वेढा घातला त्या वेळी झालेल्या चकमकीत रोहित ठार झाला, असे पोलीस महानिरीक्षक (वाराणसी परिमंडळ) अमरेंद्र सेनगर यांनी सांगितले.
या चकमकीत विशेष कृतिदलाचा कॉन्स्टेबल आलोक जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या वेळी अन्य दोन गुंडांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तुले आणि एक दुचाकी
हस्तगत करण्यात आली. सनी सिंह याच्यावर खून, दरोडा आदी गुन्हे
होते.