पोप फ्रान्सिस यांनी राजीनामा देणार नसल्याचे जाहीर केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पोप फ्रान्सिस राजीनामा देणार असल्याची बातमी वेगाने पसरली होती. मात्र, ही अफवा असून मी कोणत्याही प्रकारचा राजीनामा देणार नाही, असे पोप फ्रान्सिस यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

हेही वाचा- केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता हॉटेल, रेस्टॉरंटच्या बिलातील सर्व्हिस चार्ज देणे बंधनकारक नाही

एवढचं नाहीतर तर पोप फ्रान्सिस यांना कर्करोग झाल्याची अफवाही पसरवण्यात आली होती. मात्र, मला कोणताही गंभीर आजार नसून गुडघ्याचा त्रास झाल्यामुळे मी दवाखान्यात गेलो असल्याचे पोप यांनी स्पष्ट केले. तसेच पोप फ्रान्सिस या महिन्यात कॅनडाला भेट देणार असून लवकरच मॉस्को आणि कीव दौऱ्यावरही जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा- आंध्रप्रदेशमध्ये पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरजवळ काँग्रेसने उडवले काळे फुगे, मोदींच्या सुरक्षेत पुन्हा चूक?

पोप यांना गुडघ्याचा त्रास असल्यामुळे एक महिना त्यांना चालण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे. त्यामुळे त्यांना व्हिलचेअरचा वापर करावा लागत आहे. पोप यांच्या गुडघ्याला सूज आली होती. त्यातच त्यांनी गुडघ्यावर जास्त दाब देऊन चालल्यामुळे छोटसे फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे त्यांना गुडघ्यावर दाब देण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे. पोप फ्रान्सिस या आठवड्यात काँगो आणि दक्षिण सुदानला भेट देणार होते. परंतु त्यांना आणखी उपचाराची गरज आहे असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी आपला दौरा रद्द केला.