आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या १५ वर्षांमध्ये अखंड भारत दिसेल या वक्तव्यावरुन उपहासात्मक पद्धतीने टीका केली आहे. प्रवीण तोगडीया यांनी मोहन भागवत यांनी स्वत: रणगाड्यावर बसून पाकिस्तानवर हल्ला करावा असा खोचक सल्ला दिलाय. अखंड भारताचं हेडगेवार यांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करा. भाजपाच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या केंद्र सरकारला आदेश द्या. जर आदेश देत नसाल तर तुम्ही स्वत: काश्मिरच्या खोऱ्यामधील गावात एक रात्र राहाण्यासाठी जा. पाकव्याप्त काश्मिरमध्ये संघाची शाखा सुरु करण्यासाठी जा, मी दोन्हीसाठी तुमच्यासोबत असेल, असं तोगडीया म्हणालेत.

नक्की वाचा >> भोंग्यांच्या मुद्द्यावरुन प्रवीण तोगडीयांनी भाजपाला सुनावलं; गुजरात, मध्य प्रदेशचा दाखला देत म्हणाले, “केंद्र सरकारने प्रत्येक…”

नागपूरमध्ये मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना प्रवीण तोगडीया यांना मोहन भागवत यांनी केलेल्या अखंड भारतासंदर्भातील वक्तव्यावर मत विचारण्यात आलं. यावेळी तोगडीया यांनी तीन टप्प्यांमध्ये अखंड भारताचं स्वप्न पूर्ण करता येईल असं सांगितलं. ” मोहन भागवत यांनी १५ वर्षांमध्ये अखंड भारत होईल असं म्हटलंय. मी त्यांच्या वक्तव्याचं स्वागत आणि समर्थन करतो. मोहन भागवत स्वत:च्या डोळ्यांनी अखंड भारत साकारताना पाहतील. पण त्यांना मी आठवण करुन देऊ इच्छितो की सत्तेत नसतो तेव्हा वचन द्यायचं असतं सत्तेत असतो तेव्हा करुन दाखवायचं असतं. त्यामुळे वचन देण्याचं तुमचं काम पूर्ण झालंय,” असं तोगडीया म्हणाले.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: BJP युपीसहीत एकूण १८ राज्यांमध्ये सत्तेत पण एकाही राज्यात भोंग्यांवर बंदी नाही; गुजरातमध्ये तर न्यायालयाने…

पुढे बोलताना तोगडीया यांनी, “आता तुमच्या स्वयंसेवकांचं सरकार आहे. त्यांच्याकडे १५ लाखांचं सैन्य आहे तर आता करुन दाखवण्याची वेळ आलीय. त्यामुळे आपलं स्वागत समर्थन करताना सात वर्षांपासून काश्मिरी हिंदूना पुन्हा त्यांच्या मूळ घरी विस्थापित करण्यात आलेलं नाहीय याची आठवण करुन देत पुढील एका महिन्यात या हिंदूंचं त्यांच्या मूळ जागी विस्थापन करावं. त्यानंतर स्वत: त्यांनी काश्मिरी हिंदूंसोबत काश्मिरमधील गावात रहावं
हा अखंड भारताचा पहिला टप्पा असेल,” असं म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पाक व्याप्त काश्मिरवर ताबा मिळवावा. तिथं मोहन भागवत यांनी संघाची शाखा सुरु करावी. स्वयंसेवक म्हणून तिथं प्रवीण तोगडीया नमस्ते सदा वस्तले म्हणायला येईल. रशिया युक्रेनमध्ये घुसू शकतो तर पाक व्याप्त काश्मिर तर आपल्या बापाचा आहे. तिसऱ्या टप्प्यात पाकिस्तानवर हल्ला करा. यावेळी मोहन भागवत यांनी स्वत: टँकमध्ये बसून जावं. भागवत यांचा टँक जिथून जाईल त्या जागेची सफाई करण्याचं काम प्रवीण तोगडीया करेल,” असंही तोगडीया म्हणाले.