scorecardresearch

वाहनांचा इन्शुरन्स महागला, कार खरेदी करणाऱ्यांसाठी प्रीमियम दुप्पट

कार घेणाऱ्यांना जास्तीच्या इन्शुरन्सचा भुर्दंड, टू व्हिलरसाठीचाही इन्शुरन्स महागला

दुचाकी खरेदी करणाऱ्यांना आता त्यांच्या वाहनाच्या किंमतीच्या दहा टक्के इन्शुरन्स द्यावा लागणार आहे. तर कार खरेदी करणाऱ्यांसाठी इन्शुरन्सचा प्रीमियम दुप्पट झाला आहे. सप्टेंबर महिन्यापासून हा निर्णय लागू झाला आहे. कोर्टाने दिलेल्या दोन निर्णयांमुळे दर इतके वाढल्याचे बघायला मिळते आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्स कव्हर अनिवार्य असणार आहे. तसेच कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार कार मालकांसाठी १५ लाखांचा पर्सनल अॅक्सिडंट कव्हर घेणेही अनिवार्य असणार आहे. लॉंग टर्म प्रीमियम पेमेंट्समुळे नव्या वाहनांची किंमत वाढली आहे.

जर तुम्हाला नवीन बाईक घ्यायची असेल तर तुम्हाला किंमतीच्या दहा टक्के रक्कम इन्शुरन्स म्हणून भरावी लागणार आहे. उदाहरणार्थ तुम्ही १५० सीसीची गाडी घेतलीत आणि तिची किंमत ७५ हजार असेल तर तुम्हाला साडेसात हजार रुपये इन्शुरन्स भरावा लागणार आहे. कार खरेदी करणाऱ्या तीन वर्षांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स घेणेही अनिवार्य आहे. पर्सनल अॅक्सिडंट कव्हरसाठी ७५० रुपये जास्त खर्च करावे लागणार आहेत. १००० सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या कारसाठी इन्शुरन्स २० हजारापर्यंत पोहचला आहे. सप्टेंबर महिन्याआधी यासाठी १० हजार रुपये मोजावे लागत होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Premium up upfront cost of car cover has doubled from september