president Droupadi Murmu helicopter gets stuck kerala helipad : केरळच्या प्रमादम येथे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टरचे चाक राजीव गांधी इंडोर स्टेडियम येथे कच्चे कॉन्क्रिट केलेल्या हेलिपॅडमध्ये उतरल्याबरोबर खाली रूतल्याचे पाहायला मिळाले. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी धक्का मारून हे हेलिकॉप्टर बाहेर काढताना पाहायला मिळाले. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “अखेरच्या क्षणी हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी स्टेडियमचा पर्याय निवडला गेला आणि यामुळे मंगळवारी रात्री तेथे हेलिपॅड तयार करण्यात आला. यापूर्वी हेलिकॉप्टरला पंबाच्या जवळ निलक्कम येथ उतरवण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र वातावरण बिघडल्याने त्याला प्रमादम येथे उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिकाऱ्यांनी सांगिलं की, काँक्रिट पूर्णपणे सेट होऊ शकले नव्हते त्यामुळे जेव्हा हेलिकॉप्टर उतरवले गेले तेव्हा त्याचे वजन ते पेलवू शकले नाही आणि जिथे त्याची चाके जमिनीवर टेकली तेथे खड्डे तयार झाले.”

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या चार दिवसांच्या केरळच्या दौऱ्यावर आहेत. त्या बुधवारी शबरीमाला मंदिरात दर्शन करतील. चार दिवसांच्या दौऱ्यादरम्यान त्या मंगळवारी संध्याकाळी राज्याची राजधानी तिरुवनंतपुरम येथे पोहचल्या आणि राष्ट्रपती भवना राहिल्या आणि बुधवारी सकाळी हेलिकॉप्टरने १६० किमी अंतरावरील पथानामथिट्टा जिल्ह्यातील शबरीमाला येथे रवाना झाल्या. शबरीमाला दर्शनानंतर त्या संध्याकाळी तिरुअनन्तपुरम परत येतील. तर गुरूवारी त्या राजभवन येथे माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या प्रतिमेचे अनावरण करतील.

त्यानंतर त्या वर्कला येथे शिवगिरी मठात श्री नारायण गुरू यांच्या महासमाधि शताब्दी सोहळ्याचे उद्घाटन करतील आणि कोट्टायम जिल्ह्यातील पाला येथे सेंट थॉमस कॉलेजच्या प्लॅटिनम जुबली सोहळ्यात सहभागी होतील आणि यानंतर त्यांचा दौरा समाप्त होईल.