scorecardresearch

Video: तिने पाणावलेल्या डोळ्यांनी स्वीकारला शहीद पतीचा शौर्यचक्र पुरस्कार; सर्वच झाले भावूक

२ मे २०२० रोजी जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा भागात दहशतवाद्यांशी लढताना मेजर अनुज सूद यांना वीरमरण आले. त्यांना मरणोत्तर शौर्यचक्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Shaurya Chakra Award
स्वर्गीय मेजर अनुज सूद यांच्या पत्नी आकृती सिंग सूद यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

असाधारण शौर्य दाखवून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या राष्ट्रीय रायफल्सच्या २१ व्या बटालियनचे मेजर अनुज सूद यांना मरणोत्तर शौर्यचक्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून स्वर्गीय मेजर अनुज सूद यांच्या पत्नी आकृती सिंग सूद यांनी हा पुरस्कार स्वीकारला. २ मे २०२० रोजी जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा भागात दहशतवाद्यांशी लढताना मेजर अनुज सूद यांना वीरमरण आले. दोन वर्षांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं.

यावेळी अनुज सूद यांच्या शौर्याची कथा ऐकून सत्कार समारंभासाठी सभागृहामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वांच्याच अंगावर काटा आला तर आकृती यांच्या चेहऱ्यावर नवऱ्याला गमवाल्याचे दु:ख आणि देशासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाचा अभिमान अशा दोन्ही छटा एकाचवेळी दिसून येत होत्या. मेजर अनुज सूद यांची लहान बहीणसुद्धा सुरक्षा दलात कार्यरत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-11-2021 at 13:38 IST
ताज्या बातम्या