पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे जगातील सर्वात प्रभावी असे समकालीन शीख व्यक्ती असल्याचे शीख-१०० या निर्देशिकेच्या पहिल्या आवृत्तीत म्हटले आहे. या निर्देशिकेच्या रूपाने शीख समाजातील सर्वात शक्तिशाली, प्रभावी व समकालीन अशा शीख लोकांची क्रमवारी लावण्यात आली असून त्यात भारताचे पंतप्रधान असलेले ८१ वर्षीय डॉ. मनमोहन सिंग यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे, ते नावाजलेले विचारवंत  व विद्वान आहेत असे या निर्देशिकेत म्हटले आहे.
या निर्देशिकेत डॉ.मनमोहन सिंग यांचा उल्लेख आदराने करण्यात आला असून त्यांची चिकाटी, त्यांचा अभ्यास मोठा आहे असे म्हटले आहे.
नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मोंतेकसिंग अहलुवालिया यांचा क्रमांक ६९ वा लागला असून ते दुसरे शक्तिशाली शीख म्हणून केला आहे. जथ्थेदार सिंग साहिब ग्यानी गुरूबचन सिंग हे सध्या अमृतसर येथील श्री अकाल तख्त साहिबचे प्रमुख असून त्यांचा क्रमांक तिसरा लागला आहे. त्यांच्या पाठोपाठ पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हे चौथे आले आहेत. मास्टरकार्डचे प्रमुख अजयपाल बंगा हे अमेरिकेत असतात त्यांचा क्रमांक आठवा तर इंग्लंडमधील रॉयल कोर्ट ऑफ जस्टीसचे न्या. रबींदर सिंग यांचा क्रमांक आठवा लागला आहे. पंतप्रधानांच्या पत्नी गुरूशरण कौर यांचा क्रमांक १३ वा तर शिरोमणी अकाली दलाचे नेते उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांचा क्रमांक १४ वा लागला आहे. या निर्देशिकेत सर मोटा सिंग (क्रमांक १७), संत सिंग छटवाल (अमेरिका, १९ वे), मालविंदर व शिविंदर सिंग (फॉर्टिस हेल्शकेअरचे अध्यक्ष- २१ वे), पत्रकार व कादंबरीकार खुशवंत सिंग (२२ वे) , अपोलो टायर्सचे अध्यक्ष ओंकार सिंग कंवल (२३ वे), पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक भूपिंदर सिंग (२६ वे), क्रिकेटपटू हरभजन सिंग (२८ वा), पंजाब प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कॅ. अमरिंदर सिंग (२९वे ), द नेटवर्क ऑफ सीख ऑर्गनायझेशनचे संचालक लॉर्ड इंद्रजित सिंग (४२ वे), आदी अशी यादीतील इतर नेत्यांची नावे आहेत.