पीटीआय, निकोसिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोन दिवसांच्या सायप्रस दौऱ्यावर रविवारी आगमन झाले. अध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स यानी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. गेल्या दोन दशकांमध्ये सायप्रसला भेट देणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत.
सायप्रसची राजधानी निकोसिया येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट लिहून विमानतळावर स्वागत केल्याबद्दल अध्यक्ष क्रिस्टोडोलाइड्स यांचे आभार मानले. द्विपक्षीय संबंधांसाठी, विशेषत: व्यापार आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची ठरेल असे मोदी यांनी म्हटले आहे.
मोदी यांचा तीन देशांचा दौरा रविवारपासून सुरू झाला. सायप्रसमध्ये दोन दिवस महत्त्वाच्या भेटीगाठी आणि चर्चांनंतर ते १६ आणि १७ जूनला कॅनडात होत असलेल्या जी-७ शिखर परिषदेल उपस्थित राहतील. तेथे ते विविध राष्ट्रप्रमुखांशी चर्चाही करणार आहेत. कॅनडाच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी क्रोएशियाला रवाना होणार आहेत.