पीटीआय, सिंगापूर
विकसनशील देशांसाठी सिंगापूर प्रारूप हे प्रेरणा देणारे आहे. भारतात अनेक सिंगापूर निर्माण करण्याची इच्छा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मोदींनी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेंन वाँग यांच्याशी चर्चा केली. सिंगापूर हा केवळ भागीदार देश नसून, प्रत्येक विकसनशील देशांसाठी तो प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट केले. वाँग यांनी या वर्षी मे महिन्यात पदभार स्वीकारला आहे. मोदींनी त्यांच्या नेतृत्त्वाचे कौतुक करत, त्यांच्या नेतृत्त्वात सिंगापूरची भरभराट होईल असा विश्वास व्यक्त केला. सिंगापूरमधील साडेतीन लाख भारतीय वंशाचे नागरिक हा भक्कम द्विपक्षीय संबंधाचा पाया आहे. गेल्या दहा वर्षांत व्यापारात दुप्पट वाढ, सिंगापूरचे सतरा उपग्रह भारतातून सोडण्यात आले आहेत. या बाबींतून द्विपक्षीय संबंध अधोरेखित होत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

हेही वाचा >>>Rajnath Singh : “सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहावं”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून सतर्कतेचा इशारा!

सिंगापूरच्या अध्यक्षांशीही चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे अध्यक्ष थरमन शण्मुगरथम यांच्याशीही चर्चा केली. कौशल विकास, तंत्रज्ञान तसेच पायाभूत सुविधांमध्ये द्विपक्षीय संबंधांतून कशी प्रगती करता येईल याबाबत विचारविनिमय करण्यात आला. सिंगापूरच्या अध्यक्षांशी उत्तम चर्चा झाल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. भारतीय वंशाचे थरमन हे सिंगापूरचे नववे अध्यक्ष आहेत. दोन देशांमधील दीर्घकालीन मैत्री ही विश्वास, परस्पर आदर यावर अवलंबून आहे. तंत्रज्ञान तसेच उत्पादन क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सहकार्य अधिक कसे वाढविता येईल याबाबतही विचार करण्यात आली. तसेच सिंगापूरच्या अध्यक्षांना पुढील वर्षी भारतभेटीचे आमंत्रणही त्यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहशतवादाविरोधात खंबीर भूमिका

स्थैर्य व शांततेला दहशतवादाचा धोका आहे. सर्वच प्रकारच्या दहशतवादाचा दोन्ही देशांनी कठोर शब्दांत निषेध केला. संयुक्त निवेदनात दहशतवादाचे कोणत्याही प्रकारचे समर्थन केले जाणार नाही. सुरक्षा आणि सुबत्ता यासाठी दहशतवाद संपवणे गरजेचे आहे. दक्षिण चीन समुद्रात जलवाहतुकीचे स्वातंत्र्य अधोरेखित करण्यात आले. याचा अप्रत्यक्ष संबंध चीनशी आहे. चार सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.