के. चंद्रशेखर राव यांची टीका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘निवडणुकीसाठी पोशाख’ घालतात आणि त्यांचा अर्थसंकल्प म्हणजे ‘स्टाइल विदाऊट सबस्टन्स’चे उदाहरण आहे, अशी टीका तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे.

 केंद्रीय अर्थसंकल्प ‘भयानक व गोलमाल’ आहे, अशी प्रतिक्रया राव यांनी दिली. तीन दिवसांतच हे दोन नेते एका मोठय़ा कार्यक्रमात समोरासमोर येणार आहेत, मात्र या भेटीतही प्रत्यक्ष अशी टीका करण्यात आपण कचरणार नाही, असे राव यांनी म्हटले आहे. ‘उपर शेरवानी, अंदर परेशानी’, अशा शब्दांत पंतप्रधानांवर टीका करतानाच, मोदी यांच्या प्रशासनाचे उदाहरण म्हणून भाजप ज्या ‘गुजरात मॉडेल’चे प्रदर्शन करते त्याची राव यांनी थट्टा उडवली.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मोदी यांनी रविंद्रनाथ टागोर यांच्यासारखी दाढी वाढवली़  जर तामीळनाडूत निवडणूक असेल तर ते लुंगी घालतील, पंजाबमधील निवडणुकीसाठी ते पगडी घालतील, मणीपूरमध्ये मणीपुरी टोपी घालतील, उत्तराखंडातील तेथील स्थानिक टोपी घालतील़  अहो, अशा किती टोप्या घालणार आहात, असे राव म्हणाल़े

संत रामानुजाचार्य यांच्या पुतळय़ाच्या अनावरणासाठी मोदी शनिवारी हैदराबाद येथे येत आहेत़  एक हजार कोटी खर्च करून बांधलेला हा जगातील सर्वाधिक उंचीचा दुसरा पुतळा आह़े  यावेळी राव आणि मोदी एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार आहेत़  याबाबत विचारले असता राव म्हणाले, ‘कोणत्याही राज्यात पंतप्रधान येणार असतील, तर तेथील मुख्यमंत्र्यांना त्यांच्या स्वागतासाठी जावे लागत़े  हा राजशिष्टाचार आह़े  हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्यासोबत बसतानाही मी त्यांच्या राजकीय धोरणावर टीका करेल़’

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi attire for the election style without substance example chief minister of telangana akp
First published on: 03-02-2022 at 00:24 IST