पद्मश्री मिल्खा सिंह यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुवारी पीजीआय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळताच त्यांनी मिल्खा सिंह यांना फोन केला आणि तब्येतीची चौकशी केली. तसेच लवकर बरे होण्यासाठी प्रार्थनाही केली. घरी परतल्यावर टोकयो ऑलम्पिकमध्ये भाग घेतलेल्या भारतीय खेळाडुंचं मनोबळ वाढवा असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

मिल्खा सिंह यांना १९ मे रोजी करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना २४ मे रोजी फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना ३० मे रोजी कुटुंबाच्या आग्रहाखातर घरी सोडण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. गुरुवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिल्खा सिंह यांना ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मिल्खा सिंह यांच्या पत्नी निर्मल कौर यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने त्यांनाही आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

९१ वर्षीय मिल्खा सिंह यांनी अद्याप करोनाची लस घेतलेली नाही. मिल्खा सिंह यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा मुलगा जीव मिल्खा सिंह दुबईहून चंदीगडला आला आहे. त्याचबरोबर अमेरिकेत डॉक्टर असलेली त्यांची मुलगी मोना सिंह ही सुद्धा भारतात आली आहे.

Coronavirus: पॉलिथीनमध्ये गुंडाळून केले मृतदेहावर अंत्यसंस्कार; १५ दिवसांनी घरी परतली महिला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिल्खा सिंह यांची कारकिर्द

मिल्खा सिंह यांचा जन्म २० नोव्हेबर १९२९ रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला आहे. त्यावेळेस भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. मिल्खा सिंह यांनी २०० मी. आणि ३०० मी. धावण्याच्या स्पर्धेत बरेच मेडल जिंकले आहेत. १९६० साली झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत पहिलं सूवर्ण पदक मिल्खा सिंह यांनी पटकावलं आहे. त्यांनी धावण्याच्या स्पर्धेत ४०० मीटर अंतर ४६.६ सेकंदात पूर्ण करत ही कामगिरी केली होती. १९६० च्या रोम ऑलम्पिकमध्ये ४०० मीटर स्पर्धेतील अंतिम फेरीत त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं.