बंगळूरू :‘अग्निपथ’ योजनेविरोधात देशभर असंतोष व्यक्त केला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी त्याचा थेट उल्लेख टाळून सूचक वक्तव्य केले. ‘‘अनेक निर्णय प्रारंभी अयोग्य वाटू शकतात, परंतु नंतर मात्र ते राष्ट्रउभारणीत साहाय्यभूत ठरतात,’’ असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी बंगळूरू येथे भाषण केले. सुधारणांचा मार्ग आपल्याला नवे लक्ष्य आणि नवीन संकल्पाकडे घेऊन जाऊ शकतो. अनेक दशके सरकारी नियंत्रणाखाली असलेले अवकाश आणि संरक्षण क्षेत्र आम्ही मुक्त केले आहे. ‘स्टार्टअप’ आणि ‘इनोव्हेशनचा मार्ग सुलभ नाही. गेल्या आठ वर्षांत देशाला या मार्गावर आणणेही सोपे नव्हते. अनेक निर्णय आणि सुधारणा आज अयोग्य वाटू शकतात, परंतु यथावकाश त्याचे फायदे देशाला मिळू शकतात, असे विधान मोदी यांनी केले. तथापि, त्यांनी आपल्या भाषणात अग्निपथ योजनेचा थेट उल्लेख मात्र केला नाही.

२१ व्या शतकातील भारत संपत्ती आणि रोजगार निर्माण करणारा, त्याचबरोबर नवोन्मेषकांचा आहे, तेच देशाची खरी शक्ती आहेत. केंद्र सरकार गेल्या आठ वर्षांपासून त्यांना प्रोत्साहन देत असल्याचे मोदी यांनी नमूद केले.

मोदी यांच्या हस्ते अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले. सुधारणांचा मार्ग आपल्याला नवे लक्ष्य आणि नवीन संकल्पाकडे घेऊन जाऊ शकतो. अनेक दशके सरकारी नियंत्रणाखाली असलेले अवकाश आणि संरक्षण क्षेत्र आम्ही मुक्त केले आहे, असेही मोदी म्हणाले. या वेळी त्यांनी बंगळूरू शहराचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘सरकारने सुविधा पुरवल्या आणि हस्तक्षेप कमी केला तर भारतीय तरुण काय करू शकतात, हे या शहराने दाखवून दिले आहे. बंगळूरू हे शहर भारतीय युवकांसाठी स्वप्नांचे शहर आहे. त्यामागे उद्योजकता, नवोन्मेष आणि सरकारी आणि खासगी क्षेत्राचा योग्य उपयोग ही प्रमुख कारणे आहेत.’’

सुधारणांचा मार्ग आपल्याला नवे लक्ष्य आणि नव्या संकल्पाकडे घेऊन जाऊ शकतो. अनेक दशके सरकारी नियंत्रणाखाली असलेले अवकाश आणि संरक्षण क्षेत्र आम्ही मुक्त केले.  नरेंद्र मोदी</strong>, पंतप्रधान