पणजीतील एका इमारतीत सुरू असलेल्या डान्सबारमधील वेश्याव्यवसाय रॅकेटचा गोवा पोलिसांनी भंडाफोड केला. संबंधित डान्सबारमधून पोलिसांनी सहा तरुणींची सुटका केली असून, सहा जणांना अटक केलीये. मात्र, वेश्याव्यवसाय चालवणारा म्होरक्या घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.
पणजीचे पोलिस उपअधीक्षक महेश गांवकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. पणजीतील कॅम्पल भागातील एका इमारतीमध्ये सोमवारी रात्री गोवा पोलिसांनी छापा टाकला. संबंधित इमारत खासगी मालमत्ता असली, तरी तिच्या टेरेसवर डान्सबार होता. २० ते ३० वयोगटातील मुले तिथे डान्स करीत होत्या. पोलिसांनी अटक केलेल्या एका आरोपीने पंजाब, दिल्ली, मुंबई, छत्तीसगढ आणि उत्तर प्रदेशमधून संबंधित मुलींना तिथे आणले होते.
पोलिसांनी अजय प्रदेश सिंग, महेंद्र सिंग आणि धर्मेंद्र प्रसाद यांना अटक केली आहे. हे सर्वजण उत्तर प्रदेशमधील असून, ते संबंधित इमारतीमध्ये ग्राहक म्हणून गेले होते, असे पोलिसांनी सांगितले. याशिवाय पोलिसांनी कोमल थापा, संजीव साह आणि बाबू घंटा यांनादेखील अटक केली आहे. त्यांच्यावर मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prostitution racket busted in goa six held
First published on: 27-08-2013 at 06:08 IST