सार्वजनिक क्षेत्रातील बॅकांच्या कर्मचारी संघटनांनी त्यांच्या २५ सप्टेंबरचा प्रस्तावित संप मंगळवारी मागे घेतला. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे विलीनीकरण करण्याची सरकारीच कोणताही योजना नसल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केल्यानंतर कर्मचारी संघटनांनी आपला प्रस्तावित संप मागे घेतला.
बॅंक कर्मचाऱयांच्या दोन्ही संघटनांनी केलेल्या इतर मागण्यांचाही सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, असेही आश्वासन अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱयांनी दिले आहे, असे ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस सी. एच. वेंकटाचलम यांनी सांगितले. या आश्वासनांनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.