अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२१ पर्वाचा पहिला सामना पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाबच्या रवी बिश्नोईने अफलातून झेल घेत सर्वांना थक्क केले. कोलकाताचा संघ फलंदाजी करत असताना तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बिश्नोईने हा झेल घेतला. सुनील नरिनने डीप मीडकडे फटका खेळला. रवी बिश्नोईने हवेत सूर मारत हा झेल टिपला.

 

 

पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग तिसरे षटक टाकत होता. अर्शदीपने नरिनला शून्यावर बाद केले. काही वेळातच बिश्नोई सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. आयपीएल २०२१च्या हंगामातील हा सर्वोत्तम झेल असल्याच्या प्रतिक्रियाही समोर आल्या.

या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकाताचा कर्णधार ईऑन मॉर्गनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रसिध कृष्णा, पॅट कमिन्स आणि सुनील नरिन यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे पंजाबला २० षटकात ९ बाद १२३ धावा करता आल्या.