काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील काँग्रेस नेत्यांना आपापसातील मतभेद बाजूला ठेवून आगामी विधानसभा निवडणूक एकदिलाने लढविण्याचे आवाहन केले. केरळमध्ये आपल्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) पराभूत करू शकत नाही. या निवडणुकीत काँग्रेसला कोण पराभूत करू शकत असेल तर ती काँग्रेसच आहे, असे सांगत राहुल यांनी केरळमधील काँग्रेस नेत्यांना कानपिचक्या दिल्या. विधानसभा निवडणूक जवळ आहे. आता सर्व ज्येष्ठ नेत्यांनी त्यासाठी एकजूट व्हावं. एक-दोन महिने थांबा मग तुम्हाला आपसात काय भांडायचे ते भांडा, असेही राहुल गांधींनी यावेळी म्हटले.
  संग्रहित लेख, दिनांक 10th Feb 2016 रोजी प्रकाशित  
 काँग्रेसला फक्त काँग्रेसच हरवू शकते- राहुल गांधी
केरळमध्ये आपल्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) पराभूत करू शकत नाही.
Written by लोकसत्ता टीम
 
  First published on:  10-02-2016 at 15:50 IST  
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Put a united fight in kerala polls rahul gandhi tells workers says only congress can defeat congress