मॉस्को : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्याशी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी चर्चा केल्याची माहिती क्रेमलिनने (रशियन अध्यक्षांचे कार्यालय) दिली. व्हाइट हाऊसने रशियाला युक्रेनशी शांतता करार करण्यासाठी किंवा रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांनाही गंभीर आर्थिक दंड सहन करावा लागू शकतो यासाठी दिलेल्या अंतिम मुदतीच्या काही दिवस आधी ही चर्चा झाली.

चर्चेपूर्वी विटकॉफ यांनी पुतिन यांचे गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य दूत किरील दिमित्रीव्ह यांच्याशीही चर्चा केली होती. इस्तंबूलमध्ये रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळांमधील चर्चेच्या तीन फेऱ्या तसेच रशिया-अमेरिकेच्या अधिकाऱ्यांमधील चर्चेत दिमित्रीव्ह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तथापि, तीन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध संपविण्यासाठी झालेल्या चर्चेत कोणतीही प्रगती झालेली नाही.