लंडन : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी लिझ ट्रस यांची पंतप्रधानपदी अधिकृतपणे नियुक्ती जाहीर केली आहे. त्या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान असतील.

स्कॉटलंडमधील सुटीकालीन निवासस्थानी ट्रस यांनी महाराणी एलिझाबेथ यांची भेट घेतली. तत्पूर्वी मावळते पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी महाराणींकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. सोमवारी कन्झव्‍‌र्हेटिव्ह पक्षात झालेल्या निवडणुकीत ट्रस यांनी भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक यांचा पराभव केला होता. आता ‘१०, डाऊिनग स्ट्रीट’ या ब्रिटिश पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी ट्रस यांचे पहिले भाषण होईल आणि त्यानंतर त्या आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा करतील. अ‍ॅटर्नी जनरल सुएला ब्रेव्हरमन या ट्रस मंत्रिमंडळातील एकमेव भारतीय चेहरा असण्याची शक्यता आहे. जॉन्सन यांचे विश्वासू, माजी गृहमंत्री प्रीती पटेल आणि माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी ट्रस यांच्या मंत्रिमंडळात जाण्यास अप्रत्यक्ष नकार दिला आहे.

PM Modi Ramtek Sabha
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, “इंडिया आघाडीला त्यांच्या पापाची शिक्षा…”
Narendra Modi sanjay raut
“इस्रायली जनतेच्या उद्रेकाचे ‘आफ्टर शॉक्स’ भारतातही बसणार”, ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींना सूचक इशारा
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका
bjp complaint to ec against rahul gandhi
राहुल गांधी यांच्यावर कारवाई करा! भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी

एकमेव भारतीय चेहरा?

ट्रस मंत्रिमंडळातील सुएला ब्रेव्हरमन यांचे आई-वडील भारतीय आहेत. त्यांचे वडील क्रिस्टी यांचा जन्म गोव्यातील आहे. तर आई उमा फर्नाडिस यांचा जन्म मॉरिशरमधील तमिळ कुटुंबातला आहे. या दोघांनी ६०च्या दशकात ब्रिटनमध्ये स्थलांतर केले होते. ३ एप्रिल रोजी सुएला यांचा जन्म झाला.