विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) बदललेल्या गणवेशावरून राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी टिप्पणी केली आहे. अखेर आम्ही आरएसएसला फुल पँट घालायला भाग पाडलेच. राबडी देवी बरोबर बोलत असत की, या लोकांना संस्कृतीचे ज्ञान नाही, संघातील म्हाताऱ्या लोकांनाही इतक्या लोकांसमोर हाफ चड्डी घालायला लाज वाटत नाही. मात्र, आम्ही पिच्छा पुरवल्यामुळे संघाने हाफ पँटची फूल पँट केली. आम्ही जशी त्यांची पँट ‘फूल’ केली तशी त्यांची बुद्धीही ‘फूल’ करू. त्यांची पँटच नाही तर विचारसरणीच बदलू. त्यांना हत्यारे टाकायला लावू. समाजात विष पसरू देणार नाही, असे लालूप्रसाद यादव यांनी ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे. संघ कामात अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशातून यंदापासून संघाच्या गणवेशामध्ये हाफपँटऐवजी फुल पॅंट असा बदल करण्यात आली होता. त्याला प्रतिसाद देत अनेक युवा स्वयंसेवकांनी मोठय़ा प्रमाणात नव्या गणवेशाची खरेदी केली आणि संपूर्ण गणवेशासह ते संचलनात सहभागी झाले होते. तरूणांसोबत अनेक ज्येष्ठ स्वयंसेवकांनीही नव्या गणवेशासह संचलनात सहभाग नोंदविला. या गणवेश बदलाविषयी स्वयंसेवकांना औत्सुक्य होते. तर, ज्येष्ठ स्वयंसेवकांनी हा बदल सहजपणाने स्वीकारल्याचे दिसून आले.
काही महिन्यांपूर्वी लालूप्रसाद यांनी संघावर अशाचप्रकारची टीका केली होती. सध्या भाजपची सत्ता असल्यामुळे संघाने फूल पँट घातली आहे. मात्र, २०१९च्या लोकसभा निवडणुकांनंतर त्यांना पुन्हा हाफचड्डी घालावी लागेल, असा टोला लालूप्रसाद यांनी भाजपला लगावला होता.
हमने RSSको फुल पैंट पहनवा ही दिया।राबड़ी देवी ने सही कहा था इन्हें संस्कृति का ज्ञान नही,शर्म नहीं आती,बूढ़े-बूढ़े लोग हाफ पैंट में घूमते है
— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) October 11, 2016
अभी तो हमने हाफ को फुल पेंट करवाया है
माइंड को भी फुल करवायेंगे
पैंट ही नहीं सोच भी बदलवायेंगे
हथियार भी डलवायेंगे
जहर नही फ़ैलाने देंगे।। pic.twitter.com/LAIUV6dRYA— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) October 11, 2016