पीटीआय, हमीरपूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रचार सभांमध्ये भ्रष्टाचार आणि पैशाचा वापर करून हिमाचल प्रदेशमधील सरकार पाडणार असल्याची उघडपणे घोषणा केली आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.

पंतप्रधान मोदी यांच्या मंडी येथील शुक्रवारच्या भाषणाचा संदर्भ राहुल गांधी यांनी दिला. पंतप्रधानांनी दावा केला की, राज्यातील काँग्रेस सरकार टिकणार नाही, असे राहुल म्हणाले. नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीद्वारे अदानीसारख्या उद्याोजकांना मदत करून लहान व मध्यम व्यवसाय संपवून बेरोजगारी वाढवल्याचा आरोपही राहुल यांनी केला.

हेही वाचा >>>गरिबीचं क्रौर्य! मातेनं प्रसूतीनंतर दुसऱ्याच दिवशी कोवळ्या जिवाचा ५ हजार रुपयांना केला सौदा

काँग्रेसचे हमीरपूर लोकसभा उमेदवार सतपाल रायजादा यांना पाठिंबा मागताना गांधी म्हणाले की, लष्करी जवानांसाठी रायजादा यांना पाठिंबा द्या. देशाला दोन प्रकारचे सैनिक नको आहेत आणि केंद्रात सरकार आल्यास अग्निपथ योजना रद्द करणे ही काँग्रेसची पहिली प्राथमिकता असेल, असे राहुल गांधी यांनी सांगितले.